LPG Cylinder Price : अर्थसंकल्पाच्या आधी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ करण्यात आली असली तरी घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र स्थिर आहेत. त्यामुळे १४.२ किलो LPG ची किंमत दिल्लीत ९०३ रुपये, कोलकाता ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये आहे.

221
LPG Cylinder Price : अर्थसंकल्पाच्या आधी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ

एकीकडे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास बुधवार, ३१ जानेवारी पासून सुरुवात झाली असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज म्हणजेच गुरुवार १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी सादर होत असल्याने सरकारला तो पूर्ण स्वरूपात मांडता येणार नाही. या अंतरिम अर्थसंकल्पात सीतारामन कोणकोणत्या तरतुदी आणि घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे बजेटच्या आधीच व्यवसायिक सिलींडरच्या (LPG Cylinder Price) किमतींमध्ये वाढ झाली आहे.

(हेही वाचा – Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करतील)

IOCL च्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) किमती १४ रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे राजधानी दिल्ली मध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत १७६९.५० रुपये झाली आहे. हे नवीन दर गुरुवार १ फेब्रुवारी २०२४ पासून लागू झाले आहेत.

(हेही वाचा – Unseasonal Rains : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २,१०९ कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता)

१९ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत वाढ –

एलपीजीच्या १९ किलोच्या सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने मुंबईत (LPG Cylinder Price) पूर्वी १७०८ रुपयांना मिळणारा व्यावसायिक सिलिंडर आता १७२३ रुपयांना मिळणार आहे. दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत (LPG Cylinder Price) १७५५.५० रुपयांवरून १७६९.५० रुपये झाली आहे. तर कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत १८६९.०० रुपयांवरून १८८७ रुपये करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये त्याची किंमत १९२४.५० रुपयांवरून १९३७ रुपयांपर्यंत वाढली आहे.

(हेही वाचा – Jackie Shroff : बॉलिवूडचा भिडू अभिनेता जॅकी श्रॉफचं खरं नाव माहिती आहे का?)

घरगुती सिलिंडरच्या दरांत कोणताही बदल नाही –

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ करण्यात आली असली तरी (LPG Cylinder Price) घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र स्थिर आहेत. त्यामुळे १४.२ किलो LPG ची किंमत दिल्लीत ९०३ रुपये, कोलकाता ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.