पाटणमध्ये लव्ह जिहाद; वासनांध मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदू मुलीला मारहाण करत लैंगिक अत्याचार 

122
राज्यात दररोज कुठे ना कुठे लव्ह जिहादची प्रकरणे घडत आहेत. आता ग्रामीण भागातही हे प्रकार वाढत आहेत. मोरगिरी (पेठशिवापूर) येथील धर्मांध मुसलमान तरुण सैफअली सलीम मुकादम (२६) हे तेथील अल्पवयीन मुलीला वेळोवेळी दमदाटी, शिवीगाळ करत लैंगिक अत्याचार करायचा. रविवारी, ४ डिसेंबर रोजी रात्री हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुसलमान तरुण सैफअली सलीम मुकादम याच्यावर पाटण पोलिसांनी लैंगिक अत्याचार, ऍट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला सोमवार, ५ डिसेंबर रोजी कराड येथील न्यायलयासमोर हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेमुळे मोरगिरीसह पाटण तालुक्यात खळबळ माजली असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मुलीच्या नातेवाईकांनी केली तक्रार

मोरगिरी (पेठशिवापूर) येथील तरुण सैफअली सलीम मुकादम हा एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर १५ सप्टेंबर २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत वेळोवेळी दमदाटी, शिवीगाळ करत लैंगिक अत्याचार केले. हा मुसलमान युवक अल्पवयीन मुलीला दमदाटी आणि मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर त्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी या प्रकरणी पाटण पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावरून पाटण पोलिसांनी तात्काळ चौकशी करत सैफअली सलीम मुकादम आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी सैफअली सलीम मुकादम याच्यावर कलम भादवि ३५४, ३७६ (२) एन, ३४, सह पोक्सो अंतर्गत ४, ६, ८ गुन्हा दाखल केला आहे.

लोकांमध्ये संतापाची लाट 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सैफअली सलीम मुकादम हा अत्यंत दर्जाहीन व बेताल, असभ्य स्वरुपाचा आहे. त्याचे अनेक कारनामे अनेकवेळा उघडकीस आले आहेत. सैफअली सलीम मुकादम हा एखाद्या मुलीला अशी अमानुष मारहाण करून अश्लील कृत्य करून त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करत आहेत, हे जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे. हा प्रकार बालकांच्या हक्क व संरक्षण यावर गदा आणलेली आहे. या मुसलमान तरुण सैफअली सलीम मुकादम याला कोणतीही दया न दाखवता कठोरपणे कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.