Lok Sabha Elections : त्या पराभवामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणुकीला सामोरे जायला नाही तयार!

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सन २००९च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निलेश नारायण राणे विजयी झाले होते. निलेश राणे यांनी या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. निलेश राणे यांनी त्यावेळी ३ लाख ५३ हजार ९१५ मते मिळवली होती तर प्रभू यांना ३ लाख ०७ हजार १६५ मते मिळाली होती.

183
Lok Sabha Elections : त्या पराभवामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणुकीला सामोरे जायला नाही तयार!

आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची जोरात चर्चा सुरु असून राणे यांनी ही निवडणूक लढवावी अशाप्रकारची तीव्र इच्छा सर्वच भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, नारायण राणे हे लोकसभेची निवडणूक लढवण्यास उत्सुक नाही. नारायण राणे यांचा मालवण विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता आणि त्यानंतर वांद्रे पूर्व येथील पोटनिवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. या दोन पराभवांमुळेच राणे हे खचलेले असून सध्याचे वातावरण हे त्यांच्यासाठी अनुकूल असले तरी राणे यांना आजही इतरांकडून दगाफटका होण्याची भीती सतावत आहेत, त्यामुळेच ते अद्यापही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत नसल्याचे बोलले जात आहे. (Lok Sabha Elections)

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सन २००९च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर निलेश नारायण राणे विजयी झाले होते. निलेश राणे यांनी या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. निलेश राणे यांनी त्यावेळी ३ लाख ५३ हजार ९१५ मते मिळवली होती तर प्रभू यांना ३ लाख ०७ हजार १६५ मते मिळाली होती. त्यानंतर सन २०१४च्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत हे उभे राहिले होते आणि मोदी लाटेवर राऊत हे निवडून आले होते. या निवडणुकीत (Lok Sabha Elections) राऊत यांना ४ लाख ९३ हजार ०८८ मते मिळाली होती, तर काँग्रेस उमेदवार निलेश नारायण राणे यांना ३ लाख ४३ हजार ०३७ एवढी मते मिळाली होती. त्यामुळे आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत राणे यांना मिळणाऱ्या मतांमध्ये केवळ दहा हजार मतांचा फरक पडला होता. त्यामुळे राणे यांची परंपरागत मते कायमच राहिली होती. (Lok Sabha Elections)

मात्र सन २०१९च्या निवडणुकीत नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला होता. या पक्षाच्यावतीने निलेश राणे हे निवडणूक लढले होते. त्यामुळे सन २०१९च्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युती पुन्हा झाल्याने युतीचे उमेदवार म्हणून विनायक राऊत हे विजयी झाले असले तरी सन २०१४च्या निवडणुकीतील मतांच्या तुलनेत ३५ हजार मतदान कमी झाले होते. तर निलेश राणे यांनी २ लाख ७९ हजार ७०० मते मिळवली होती. त्यामुळे मागील निवडणुकीत मतांच्या तुलनेत राणे यांना ६३ हजार ३३७ कमी मतदान झाले होते. त्यामुळे राणे कुटुंबांचे निव्वळ मतदान हे सुमारे २ लाख ८० हजार एवढे असून जे ६३ हजार मतदान कमी झाले होते, तेवढेच मतदान काँग्रेसचे उमेदवार हे नवीनचंद्र बांदिवडेकर यांना झाले होते. त्यामुळे सन २००९च्या निवडणुकीत विजयी झालेल्या निलेश राणे यांचा सन २०१४ आणि २०१९ पराभव झाला होता. त्यामुळे निलेश राणे यांचा सलग दोनदा झालेला पराभव झालेला आहे. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar Film : गोव्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी)

नारायण राणेंना आजही दगाफटका होण्याची भीती

या मतदार संघातून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवडणूक लढवावी अशाप्रकारची मागणी पक्षाकडून होत आहे. भाजपाकडून नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरु असून या मतदार संघातून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव शिवसेनेकडून सुरु आहे. ही जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी पक्षाकडून होत आहे, मात्र ही जागा भाजपाला सोडण्याची आणि नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा विचार केला जात आहे. परंतु नारायण राणे यांच्याकडून अद्यापही याला प्रतिसाद दिला जात नसून सध्या राणे हे भाजपामध्ये असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मनसे सोबत येणार असल्याने राणे यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्यासाठी मतदार संघात अनुकूल वातावरण आहे. (Lok Sabha Elections)

राणे यांचे हक्काचे सुमारे अडीच लाख मतदार असून रत्नागिरीत जर उदय सामंत आणि सावंतवाडी मतदार संघात दिपक केसरकर यांनी ताकद लावल्यास भाजपच्या उमेदवार म्हणून राणे निवडणूक रिंगणात उतरल्यास त्यांच्यासाठी अनुकूल असेच वातावरण आहे. नारायण राणे हे सध्या केंद्रीय मंत्री असून त्यांनी लघु व सूक्ष्म मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक बेरोजगार संस्था, महिला संस्थांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून मदत केली आहे. त्यामुळे राणे यांच्या कामामुळे याचा परिणाम निवडणुकीतील मतांवर होणार असून सध्याचे वातावरण हे अनुकूल असूनही यापूर्वीच्या दोन पराभवामुळे मानसिक खचलेल्या राणे यांचे मन अजून आगामी निवडणुकीसाठी तयार होत नसल्याचे बोलले जात आहे. राणे यांना आजही दगाफटका होण्याची भीती वाटत असून त्याच भीतीपोटी नारायण राणे हे या निवडणुकीसाठी अद्यापही तयार नसल्याचे बोलले जात आहे. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.