Swatantra Veer Savarkar Film : गोव्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करण्याची मागणी

125

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रणदीप हुड्डा यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेला ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar Film) हा चित्रपट गोव्यात करमुक्त करावा, अशी मागणी ‘वीर सावरकर युवा मंच, डिचोली’ संघटनेने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ‘वीर सावरकर युवा मंच’ ही सावरकरांच्या मूल्यांवर आधारित समाजात अविरतपणे कार्य करणारी संस्था आहे. आजपासून सिनमागृहात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantra Veer Savarkar Film) हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

मुख्यमंत्री सावंत यांना निवेदन 

वीर सावरकरांची कार्यगाथा, देशासाठी त्यांनी केलेला संघर्ष या सगळ्या गोष्टी आताच्या पिढीला व विद्यार्थ्यांना माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या युवापिढीने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन देशभक्ती वाढवली पाहिजे. देशातील सर्वसामान्य व्यक्तीला वीर सावरकर कोण होते, त्यांनी आपले जीवन देशासाठी कसे समर्पित केले. याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्वाला धरून जे विनाकारण वाद निर्माण केले जातात त्याला चाप बसेल. म्हणून सर्वसामान्यांना हा चित्रपट बघता यावा यासाठी आपण हा चित्रपट (Swatantra Veer Savarkar Film) करमुक्त करावा व गोव्यातील विद्यार्थ्यांना हा चित्रपट मोफत दाखवावा, अशी मागणी मंचातर्फे करण्यात आली आहे. मंचाचे अध्यक्ष रामकृष्ण दळवी व मंचाचे माजी अध्यक्ष विजय होबळे यांनी तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अखंड भारतासाठी दिलेला लढा आपण ऐकला आहे, वाचला आहे. मात्र त्यांची विद्वत्ता, माणूस म्हणून ते कसे होते आणि अखंड भारत त्यांच्या नसानसात कसा भिनला होता याची अनुभूती देणारा सिनेमा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar Film). त्यांना आपण प्रत्यक्षात पाहतोय की काय असा अद्भुत अनुभव रणदीप हुड्डाने अभिनय आणि दिग्दर्शनातून दिला आहे. दिग्दर्शक रणदीप हुड्डा ते पेलण्यात यशस्वी झाला आहेत. हा चित्रपट आजपासून सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.