Local services : ‘पुणे ते लोणावळा’दरम्यान बंद असलेली लोकल सेवा पुन्हा सुरू होणार, जाणून घ्या वेळ

विद्यार्थी व कामाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांचे हाल होत होते. त्यामुळे दुपारची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.

196
Central Railway : मोटरमनने प्रगती एक्स्प्रेससमोर जीव दिला, १००पेक्षा जास्त लोकल रद्द
Central Railway : मोटरमनने प्रगती एक्स्प्रेससमोर जीव दिला, १००पेक्षा जास्त लोकल रद्द

करोनानंतर दुपारच्या टप्प्यात ‘पुणे ते लोणावळा’दरम्यान बंद असलेली लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही सेवा (Local services ) पुन्हा सुरू झाल्याने फायदा होणार आहे. शिवाजीनगर येथून दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी लोकल सोडण्यात येणार आहे.

करोनाच्या काळात रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी पुणे-लोणावळा लोकल सेवा बंद करण्यात आली होती. करोनाचे सावट संपल्यानंतर लोकल सेवा सुरू केली होती, पण दुपारच्या टप्प्यातील लोकल सेवा बंद होती. त्यामुळे विद्यार्थी व कामाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांचे हाल होत होते. त्यामुळे दुपारची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.

(हेही वाचा – Crime News : मिठी नदीत सापडलेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, अनैतिक संबंधातून केली होती हत्या)

रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) दुपारच्या टप्प्यात देखभाल दुरुस्तीची कामे केली जात असल्यामुळे लोकल सेवा सुरू करण्यास नकार दिला जात होता, पण नागरिकांकडून अनेक वेळा दुपारची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आली होती. काही वेळा रेल्वे आडविण्याच्या घटना घडल्या होत्या. शुक्रवारी सकाळी याच मागणीसाठी लोणावळा येथे डेक्कन क्वीन अडविण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने दुपारच्या टप्प्यात शिवाजीनगर (shivajinagar) येथून एक व लोणावळा येथून एक अशी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

अशी वेळ असेल दुपारच्या लोकलची
– शिवाजीनगरहून १२ वाजून पाच मिनिटांनी लोकल सुटेल. ती १२ वाजून ४५ मिनिटांनी लोणावळा येथे पोहोचेल.
– लोणवाळा येथून सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी लोकल सुटेल. ती शिवाजीनगर येथे एक वाजून २० मिनिटांनी दाखल होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.