बेस्टच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास होणार ‘BEST’!

85

मुंबईत सध्या असलेल्या कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आणि बेस्टच्या – बस गाडयांमधून संपर्कविरहीत तिकीट देवाण घेवाण करण्याच्या दृष्टीकोनातून बेस्ट उपक्रमाने दिनांक २० जानेवारी २०२२ पासून बेस्ट ‘चलो मोबाईल अ‍ॅप’ सोबत युनिव्हर्सल वाहतूक पास सोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बेस्टचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी चलो अ‍ॅपचे अनावरण केले व हे अ‍ॅप मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाले आहे. यामुळे मुंबईकरांना अनेक सुविधा प्राप्त होणार असून घरबसल्या आपली बस कुठे आहे हे सुद्धा ट्रॅक करता येणार आहे.

…तर युनिव्हर्सल पास दाखवणे बंधनकारक 

कोणताही प्रवासी जेव्हा तिकीट खरेदी करण्याकरिता बेस्ट चलो अ‍ॅपचा वापर करेल, तेव्हा तो युनिव्हर्सल पास सोबत जोडला जाऊन त्याची पडताळणी तिकीट मशिनद्वारे आपोआप केली जाईल. प्रवाशांना युनिव्हर्सल पास प्रत्यक्षात जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही. तथापि, जो प्रवासी रोख रकमेद्वारे अथवा स्मार्ट कार्डद्वारे तिकीट खरेदी करेल त्याला युनिव्हर्सल पास बसवाहकाला दाखविणे बंधनकारक राहिल.

( हेही वाचा : मुंबईकरांनो… कडाक्याच्या थंडीत बाहेर पडताय? अशी घ्या काळजी )

बेस्टचे आवाहन 

संपर्क विरहीत तिकीट देवाण घेवाण करण्याकरिता बेस्ट चलो अ‍ॅपचा वापर करावा आणि युनिव्हर्सल पास डाऊनलोड करावा. असे आवाहन बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येत आहे.

BEST 1

( हेही वाचा : अरे वा! सात दिवसांत ३ अवयवदानामुळं ५ जणांना मिळालं नवं आयुष्य )

सदर अ‍ॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध असून हे अ‍ॅप  https://play.google.com/store/apps/details?id=App.zophop. या लिंकद्वारे देखील डाऊनलोड करता येते. आयफोन आणि इतर फोनचा वापर करणा-यांनी chalo.com/app ला भेट द्यावी.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.