Pune : पुण्यात सिंहगड परिसराला भेट देताना सावधान; कारण…

143

पुणे जिल्ह्यातील मोदरवाडी परिसरात मंगळवारी, १८ जुलै रोजी सकाळी बिबट्या स्थानिकांना दिसला. बिबट्या झाडीझुडपातूनही सहज दिसून येत असल्याने पुणे वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. भल्या पहाटे सिंहगड चढण्यासाठी पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे प्रादेशिक वनविभागाने केले आहे.

सध्या पुणे व नजीकच्या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. विकेंड तसेच इतर दिवसातही सिंहगड परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. मंगळवारी सकाळी माजी सरपंच दिलीप यादव यांच्या गच्चीवरून समोरच्या डोंगराळ भागातील झाडीझुडपातून मोकळ्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला. बिबट्या दिसताच क्षणी यादव यांच्या मुलांनी बिबट्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून वनविभागाला माहिती दिली. सिंहगडाचा परिसर पुणे प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत येतो. किल्ल्यावर जाण्यासाठी अगोदरच अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. कित्येक पर्यटक ट्रेकसाठी चालत जातात. अशा परिस्थितीत कोणतीही दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून वनविभागाने गावकरी तसेच पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वनाधिकाऱ्यांनी सिंहगड परिसरात गस्ती पथक वाढवून बिबट्याच्या हालचाली टिपण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा Mission 2024 : विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव ‘इंडिया,’; २६ पक्षांनी मिळून पारित केला प्रस्ताव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.