Heavy Rain : तळकोकणात मुसळधार पाऊस; कुडाळ तालुक्यातील 27 गावांचा संपर्क तुटला

180

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर नदी, नाले, ओढ्यांना देखील पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात आज यलो अलर्ट  देण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात सकाळपासून सततधार पाऊस कोसळत होता. सायंकाळी पावसाने जोर धरल्यामुळे जिल्ह्यात सकल भागात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. आज जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कुडाळ तालुक्यात पडला असून कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील 27 गावांचा संपर्क तुटला आहे.

कुडाळ तालुक्यातील माणगावमधील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेल्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या तासाभरापासून या पूलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं आहे. तसेच माणगाव खोऱ्यातील दुकानवाड पूल देखील पाण्याखाली गेलं आहे. तर कुडाळवरून माणगावला जाण्यासाठी झाराप माणगाव या रस्त्यावरील साळगाव मधील पूल देखील पाण्याखाली गेला आहे.

(हेही वाचा India : भारतात राहून पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ३ मुसलमानांना सुनावली जन्मठेप)

सह्याद्रीच्या खोऱ्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे निर्मला नदीला पूर आला आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरून माणगाव खोऱ्यात जाण्यासाठी जाणाऱ्या झाराप माणगाव रस्त्यावरील देखील दोन पुल पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे माणगाव खोऱ्यात पाणीच पाणी झाल्याची स्थिती सध्या सिंधुदुर्गात आहे. कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची हवामान खात्याने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.