MMRDA : मेट्रो कारशेडसाठी जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत

मुंबई मेट्रो टप्पा-४, ४ अ, १० आणि ११ या मेट्रो मार्गांसाठी मौजे मोघरपाडा येथे सर्वे नं. ३० मधील १७४.०१ हेक्टर क्षेत्र एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात येईल.

95
MMRDA : मेट्रो कारशेडसाठी जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत
MMRDA : मेट्रो कारशेडसाठी जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत

मेट्रो कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्याचा त्याचप्रमाणे राज्यातील मेट्रो प्रकल्पांना ब्रीज लोन साठी शासन हमी देण्यासंदर्भात निर्णय घेण्याकरिता उच्चाधिकार समिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

मुंबई मेट्रो टप्पा-४, ४ अ, १० आणि ११ या मेट्रो मार्गांसाठी मौजे मोघरपाडा येथे सर्वे नं. ३० मधील १७४.०१ हेक्टर क्षेत्र एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यात येईल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आवश्यक जमीन संपादनाची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मोघरपाडा या ठिकाणच्या १६७ भाडेपट्टेधारक शेतकरी आणि ३१ अतिक्रमणधारक ग्रामस्थ यांच्यासाठी भरपाईची सुयोग्य योजना एमएमआरडीएने त्यांच्या स्तरावरुन करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Road Safety Measures : रस्ते सुरक्षा उपाययोजनांसाठी विभागीय पातळीवर अभियंत्यांना प्रशिक्षण)

ब्रीज लोनसाठी समिती

मुंबई मेट्रो मार्ग-३ साठी मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनला १ हजार कोटी रुपयांचे ब्रीज लोन देण्यासाठी शासन हमी देण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे राज्यातील फक्त मेट्रो प्रकल्पांना तात्पुरत्या स्वरुपात ब्रीज लोन घेण्याकरिता शासन हमी देण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीचा कार्यकाळ दोन वर्षांनी शासन मान्यतेने वाढविण्यात येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.