Home समाजकारण Change In Bus Routes : दहीहंडीमुळे अनेक मार्गावरील बसेसचे मार्ग बदलले

Change In Bus Routes : दहीहंडीमुळे अनेक मार्गावरील बसेसचे मार्ग बदलले

33
Change In Bus Routes : दहीहंडीमुळे अनेक मार्गावरील बसेसचे मार्ग बदलले
Change In Bus Routes : दहीहंडीमुळे अनेक मार्गावरील बसेसचे मार्ग बदलले

गोपाळकाल्याच्या दिवशी मुंबईत अनेक ठिकाणी बांधण्यात आलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमांसाठी उभारण्यात आलेल्या मंडपांमुळे बऱ्याच मार्गावरील बसला मार्ग वळते करावे लागले आहे. (Change In Bus Routes) रस्त्यावरील या मंडपांमुळे, तसेच दहिहंडीमुळे काही ठिकाणी खंडित करण्यात आले तर दुसऱ्या मार्गावरुन वळते करण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी बस प्रवाशांना आपल्या बस स्टॉपच्या आधी उतरुन किंवा अन्य मार्गाचा वापर करत वळणाच्या मार्गावरून घर गाठावे लागले.

(हेही वाचा – Ganesh Festival In Mumbai : मुंबईत यंदाचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने ठरणार निर्बंधमुक्त)

मुंबईत बुधवारी गोकुळाष्टमीच्या दिवशी, तसेच आदल्या दिवसापासूनच दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आयोजकांचे सभा मंडप उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक मार्गावरील बसेस अन्य मार्गाने वळवाले लागले. श्रेयस जंक्शन येथे मंडप बांधल्यामुळे बसमार्ग क्रमांक ४१० डाऊन दिशेत ७ वाजल्यापासून अमृतनगरकडे न जाता सरळ विक्रोळी आगाराकडे जातील अशाप्रकारे सुरु ठेवण्यात आले आहे. (Change In Bus Routes)

तर दहिसर पश्चिम रावळपाडा बस थांब्यावर मंडप बांधल्यामुळे बस मार्ग क्रमांक २९८चे प्रवर्तन दुपारी एक वाजल्यापासून डोंगरेवाडी येथे खंडित करण्यात आले. तर विक्रोळी कन्नमवार नगर, ईमारत क्रमांक १५० येथे दही हंडी उत्सवा निमित्त मंडप बांधल्यामुळे बस मार्ग क्रमांक ३९७ च्या बस गाड्या दुपारी अडीच वाजल्यापासून रामचंद्र शिरोडकर या पर्यायी मार्गाने सुरु ठेवण्यात आल्या आहेत.

मानखुर्द स्टेशन येथे दही हंडी उत्सवानिमित्त मंडप बांधल्यामुळे बस मार्ग क्रमांक ३७८ चे प्रवर्तन दोन वाजल्यापासून महानगर पालिका शाळा येथे खंडित करण्यात आल्या. (Change In Bus Routes)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
error: Content is protected !!