अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (Amrit Bharat Station Scheme) कुर्ला स्टेशनच्या सुधारणा प्रकल्पास विलंब होत असून, 30 नोव्हेंबर 2024 ची निश्चित केलेली डेडलाईन चुकली असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. सद्यस्थितीत केवळ 40% काम पूर्ण झाले असून, हा प्रकल्प आणखी किती महिने लांबणार, असा प्रश्न प्रवाशांमध्ये निर्माण झाला आहे.
अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराखाली मध्य रेल्वेकडे विचारणा केली असता, 7 डिसेंबर 2023 रोजी मेसर्स Technocrat Associates या कंपनीला कामाचा आदेश देण्यात आल्याचे समजले. प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2024 होती. मात्र, निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले की, सद्यस्थितीत केवळ 40% कामच पूर्ण झाले असून, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रु. 10.94 कोटींचा खर्च केला जात आहे. (Amrit Bharat Station Scheme)
(हेही वाचा – Land Jihad आणि बेकायदेशीर कब्रिस्तानावर आळा घालणे ही काळाची गरज; ‘विहिंप’ने केले निवेदन जारी)
अनिल गलगली यांनी या कामाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत म्हटले की, रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि कंत्राटदारांवर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाहीत. या प्रकरणात संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी आणि कामचुकार ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Amrit Bharat Station Scheme)
कुर्ला स्टेशन येथील प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात आणि परिसराचा विकास व्हावा यासाठी अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत गती शक्ती युनिट तर्फे पायाभूत सुविधा सुधारणा आणि सौंदर्यीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे सुधारणा व परिसर सौंदर्यीकरण करणे. प्रवेशद्वारांचा विकास व सुशोभीकरण करणे. उच्चस्तरीय प्लॅटफॉर्म आणि संपूर्ण प्लॅटफॉर्मवर छप्पर बसविणे. स्थानकाची उंची व संरचनेत सुधारणा करणे. स्टेशन अंतर्गत सजावट, प्रतीक्षा कक्ष आणि अन्य सुविधांचे अद्ययावतिकरण करणे. शौचालयांचे आधुनिकीकरण व स्वच्छतेवर भर देणे. दर्जेदार आणि टिकाऊ फर्निचरची उपलब्धता करणे.12 मीटर रुंद मध्यवर्ती पादचारी पुलाची (फूट ओव्हर ब्रिज) उभारणी, ज्यामध्ये रॅम्पची सुविधाही करणे ही कामे अंतर्भूत आहेत. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का, की आणखी काही महिने प्रवाशांना गैरसोयी सहन कराव्या लागतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Amrit Bharat Station Scheme)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community