Kisan Mahapanchayat : दिल्ली पोलिसांची किसान महापंचायतला सशर्त परवानगी

पोलिसांनी घालून दिलेल्या अटींनुसार, शेतकऱ्यांना रामलीला मैदानावर ५ हजारपेक्षा जास्त संख्येने एकत्र येण्याची गरज नाही. ट्रॅक्टर आणू नये आणि मैदानावर मोर्चा काढू नये, अशी अट देखील घालण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

86
Kisan Mahapanchayat : दिल्ली पोलिसांची किसान महापंचायतला सशर्त परवानगी

दिल्लीच्या रामलीला मैदानावर आज म्हणजेच गुरुवार १४ मार्च रोजी आयोजित संयुक्त किसान मोर्चाच्या महापंचायतीला (Kisan Mahapanchayat) दिल्ली पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे.

(हेही वाचा – Cabinet Decision : मराठी भाषा ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणार – मंत्री दीपक केसरकर)

केवळ ५ हजार लोकांना एकत्र येण्याची परवानगी :

संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानंतर पंजाबमधून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीत पोहोचण्याची अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य ती तयारी सुरू केली असून पोलिसांनी या संदर्भात अलर्ट जारी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियम आणि अटींनुसार महापंचायतीमध्ये केवळ ५ हजार लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन होणार नाही :

पोलीस उपायुक्त (मध्य) एम. हर्षवर्धन यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली पोलिसांनी काही अटींसह आज रामलीला मैदानावर ‘किसान मजदूर महापंचायत’ आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. पोलिसांनी घालून दिलेल्या अटींनुसार, शेतकऱ्यांना रामलीला मैदानावर ५ हजारपेक्षा जास्त संख्येने एकत्र येण्याची गरज नाही. ट्रॅक्टर आणू नये आणि मैदानावर मोर्चा काढू नये, अशी अट देखील घालण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. या काळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होऊ शकते, यासाठी दिल्लीत मार्ग बदलण्यात आले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी २:३० नंतर त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच शेतकऱ्यांना मैदान रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी; जगन्नाथ शंकरशेठ स्मारकासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी)

सरकारच्या धोरणांविरुद्ध ‘लढा तीव्र’ करण्यासाठी :

शेतकरी संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) म्हटले आहे की ते रामलीला मैदानावर ‘किसान मजदूर महापंचायत’ आयोजित करतील. यामध्ये सरकारच्या धोरणांविरुद्ध ‘लढा तीव्र’ करण्यासाठी ठराव मंजूर केला जाईल.

मूलभूत सुविधांसाठी एनओसी जारी :

मंगळवारी (१२ मार्च) जारी केलेल्या निवेदनात, संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) म्हटले आहे की दिल्ली पोलिसांनी १४ मार्च रोजी रामलीला मैदानावर महापंचायत आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) सहकार्याने पार्किंगची जागा आणि पाणीपुरवठा, शौचालये आणि रुग्णवाहिका यासारख्या इतर मूलभूत सुविधांसाठी एनओसी जारी करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (मध्य) एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ५ हजार लोकांसह महापंचायत आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही पहा –  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.