Kedarnath मंदिराचे दरवाजे १० मे रोजी उघडणार

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि आरोग्य मंत्री डॉ. धनसिंग रावत यांच्या सूचनेनुसार विभाग चारधाम यात्रेच्या तयारीत व्यस्त आहे. चारधाम यात्रेसंदर्भात मुख्य सचिव राधा रातुरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली.

145
Kedarnath मंदिराचे दरवाजे १० मे रोजी उघडणार
Kedarnath मंदिराचे दरवाजे १० मे रोजी उघडणार

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर शिव भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आगामी १० मे रोजी केदारनाथच्या (Kedarnath) मंदिराची द्वारे उघडणार आहेत. ओंकारेश्वर मंदिर उखीमठमध्ये ही तारीख घोषित करण्यात आली. येत्या १० मे रोजी शुभ मुहूर्तावर सकाळी ७ वाजता दरवाजे उघडले जाणार आहेत.

(हेही वाचा – Veer Savarkar : भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी स्थान देऊन कार्यक्रमाचे ‘मैत्र जीवांचे’ नाव सार्थ ठरवले)

यात्रा मार्गावर अनुभवी व प्रशिक्षित वैद्यकीय पथके तैनात :

उत्तराखंडचा आरोग्य विभाग चारधाम यात्रा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्याची तयारी करत आहे. यासह चारधाम यात्रेपूर्वी बद्रीनाथ आणि केदारनाथमध्ये रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत. या रुग्णालयांसाठी उपकरणे खरेदी करण्यास मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे आरोग्य सचिव डॉ. आर. राजेश कुमार यांनी सांगितले. याशिवाय यात्रेकरूंना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी चारधाम यात्रा मार्गावर अनुभवी व प्रशिक्षित वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच त्यांनी यात्रेकरूंना चारधाम यात्रेसाठी येण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करून घेण्याचे आवाहन केले. (Kedarnath)

(हेही वाचा – North-East Mumbai lok Sabha : ईशान्य मुंबईत मानखुर्द शिवाजीनगरमधील मते ठरणार बोनस पॉईंट)

आरोग्य सचिव डॉ. आर. राजेश कुमार म्हणाले की,

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Chief Minister Pushkar Singh Dhami) आणि आरोग्य मंत्री डॉ. धनसिंग रावत यांच्या सूचनेनुसार विभाग चारधाम यात्रेच्या तयारीत व्यस्त आहे. चारधाम यात्रेसंदर्भात मुख्य सचिव राधा रातुरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यात चारधाम यात्रेच्या पूर्वतयारीसोबतच सर्व विभागांमधील समन्वय सुधारण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी यात्रेकरूंच्या सोयीसाठी सुमारे १५० जणांचे वैद्यकीय पथक चारधाममध्ये नेमण्यात येणार आहे. या टीमला उंचावर काम करण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Kedarnath)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.