Kanjurmarg मिठागर आयुक्तांच्या ताब्यातील जमीन महापालिकेची; पूर्व द्रुतगती महामार्गावरून आता कांजूर गावात सुसाट प्रवास

मिठागराच्या मालकीची जमिनीवरील रस्त्याची ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने तब्बल १८ कोटी रुपयांची रक्कम मिठागर आयुक्तांना अदा केली जाणार आहे.

6129
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
BMC : अखेर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांची बदली, अभिजीत बांगर नवे अतिरिक्त आयुक्त
  • सचिन धानजी,मुंबई

पूर्व द्रुतगती महामार्ग ते कांजूर व्हिलेज रोडला जोडला जाणारा रस्ता आता महापालिकेच्या मालकीचा होणार असून या रस्त्याची जागा आता महापालिकेच्यावतीने मिठागार आयुक्तांच्या मंजुरीने हस्तांतरीत केली जात आहे. मिठागराच्या मालकीची जमिनीवरील रस्त्याची ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने तब्बल १८ कोटी रुपयांची रक्कम मिठागर आयुक्तांना अदा केली जाणार आहे. (Kanjurmarg)

भारत सरकारच्या मिठागर आयुक्त यांच्या मालकीच्या कांजूर येथील विकास आराखडा २०३४ नुसार सुमारे ६० फुट रुंदीचा रस्त्यासाठी आरक्षित असलेला भूखंड महापालिकेच्यावतीने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग ते कांजूर गाव असा जोडला जाणारा हा रस्ता वापरात असला तरी यावर अनेक बांधकामे आहेत. त्यामुळे या रस्त्यासाठी आरक्षित बाधित जमिनीचा ताबा घेतला जात आहे. या नियोजित रस्त्यांची जागा मिठागार आयुक्तांकडून महापालिकेने ताब्यात घेऊन त्यावर रस्त्यांचे बांधकाम केले जावे अशी मागणी स्थानिक माजी नगरसेविका सारीका मंगेश पवार यांनी नियोजन विभागाकडे या भूसंपादनाच्या कामाचा पाठपुरावा सुरु ठेवला. त्याला आता यश आले आहे. (Kanjurmarg)

यासाठी रस्त्याचा विकास आवश्यक

त्यानुसार विकास नियोजन विभागाच्यावतीने याबाबतची कार्यवाही पूर्ण करत या जमिनीचा मोबदला म्हणून मिठागर आयुक्तांना अर्थात केंद्र सरकारला १८ कोटी रुपयांची रक्कम अदा करत याचा ताबा घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कांजूर पूर्व येथील नागरिकांकरता पूर्व द्रुतगती मार्ग तसेच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड यांना जोणाऱ्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात येत आहे. त्यानुसार पूर्व द्रुतगती मार्ग ते कांजूर व्हिलेज रोडला जोडणाऱ्या या रस्त्यांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हा मिठागर आयुक्तांकडून या रस्त्यांची जागा ताब्यात घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Kanjurmarg)

(हेही वाचा – Aaditya L1 :आदित्य-एल 1 बाबत आली मोठी अपडेट; मॅग्नेटोमीटर बूम L1 पॉइंटवर तैनात)

अशी झाली होती सुरुवात

याआधी सप्टेंबर २०१९मध्ये भारत सरकारच्या ताब्यातील या रस्त्याची जमिन महापालिकेच्या भांडुप पूर्व व भांडुप पश्चिम यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु त्यावेळी ही जमिन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यानुसार आर्थिक मोबदला संबंधितांना देण्याचा निर्णय घेतला. (Kanjurmarg)

अडीच चौरस मीटरची एकूण जागा

त्यानुसार महापालिकेने भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्या धोरणानुसार मिठागर आयुक्तांना बाजारभावानुसार आरक्षित जागेचा मोबदला देण्याचे हमी पत्र दिले. त्यानुसार अडीच हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा १७.६२ कोटी रुपये एवढी रक्कम केंद्र शासनाला मोजून रस्त्याची ही जागा संपादनाची प्रक्रिया सुरु केली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कांजूर मागावरील रहिवाशांना आता मोठा आणि पक्का रस्ता प्राप्त होणार आहे. (Kanjurmarg)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.