कल्याण-डोंबिवलीकरांची ‘त्या’ 12 जणांनी उडवली झोप

93

राज्याचा ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण कल्याण-डोंबिवली येथे सापडला, अशा प्रकारे कल्याण-डोंबिवलीने राज्याची झोप उडवली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३१८ परदेशातून नागरिक आले आहेत. त्यातील आतापर्यंत ३०६ जणांचा ठावठिकाणा लागला आहे. मात्र उर्वरित १२ जणांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे स्वत: कल्याण-डोंबिवली महापालिकेने म्हटले आहे. त्यामुळे ते १२ जण कुठे आहेत, या विचाराने कल्याण-डोंबिवलीकरांची अक्षरश: झोप उडाली आहेत.

३०६ नागरिक यांचा शोध लागला

कल्याण-डोंबिवलीने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत महापालिकेला परदेशातून आलेल्या ३१८ नागरिकांची यादी शासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी ३०६ नागरिक यांचा शोध लागला आहे, उर्वरित १२ नागरिकांपैकी काहींचे पत्ते अपूर्ण आहेत, अथवा त्यांची घरे बंद आढळून आली आहेत, त्यामुळे अपूर्ण पत्ते असलेल्या नागरिकांची यादी शासनास परत पाठवून त्यांचे पूर्ण पत्ते घेतले जाणार आहेत आणि नागरिकांची घरे बंद आढळून आली आहेत. त्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पुनश्च भेट देऊन पाठपुरावा करण्यात येत आहे, असे महापालिकेने कळवले आहे. ओमायक्रॉन हा विषाणू अधिक जलद गतीने प्रसारीत होत आहे, यामुळे सर्वांची झोप उडाली आहे. म्हणून या १२ जणांचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरले आहे.

(हेही वाचा सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे ओबीसींच्या 400 जागांवर परिणाम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.