K.E.M Hospital : के.ई.एम रूग्णालयात हेल्प डेस्क आणि अस्थिव्यंग अत्याधुनिक शल्यक्रियागारचे गुरुवारी लोकार्पण

अस्थिव्यंग शस्त्रक्रिया विभागाचे अत्याधुनिक शल्यक्रियागार यांचे  लोकार्पण गुरुवारी सायंकाळी  होणार आहे

99
K.E.M Hospital : के.ई.एम रूग्णालयात हेल्प डेस्क आणि अस्थिव्यंग अत्याधुनिक शल्यक्रियागारचे गुरुवारी लोकार्पण
K.E.M Hospital : के.ई.एम रूग्णालयात हेल्प डेस्क आणि अस्थिव्यंग अत्याधुनिक शल्यक्रियागारचे गुरुवारी लोकार्पण
गोधर्नदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड सातवे स्मारक रुग्णालय अर्थात  केईएम रुग्णालयातील अस्थिव्यंग (K.E.M Hospital) शस्त्रक्रिया विभागाचे अत्याधुनिक शल्यक्रियागार ( Modular Orthopaedic Operation Theater) रुग्णांसाठी खुले होत आहे. गुरुवारी या अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृहाचे लोकार्पण होणार असून त्यामुळे याठिकाणी सांधे बदल शस्त्रक्रिया आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेसारख्या जटिल शस्त्रक्रिया पार  पडल्या जातील.
के. ई .एम रुग्णालयात (K.E.M Hospital) भारतातील कानाकोप-यातील असंख्य रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांना त्यांना योग्य असे दिशादर्शक मार्गदर्शनाची गरज भासते. त्यामुळे उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि त्यांच्या पथकाच्या अथक परिश्रमातून रुग्णमित्र (HELP DESK) चे अनावरण आणि अस्थिव्यंग शस्त्रक्रिया विभागाचे अत्याधुनिक शल्यक्रियागार यांचे  लोकार्पण गुरुवारी सायंकाळी  होणार आहे. अस्थिव्यंग शस्त्रक्रिया विभागाचे अत्याधुनिक शल्यक्रियागार लोकार्पण शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते तर रुग्णमित्र (HELP DESK) चे अनावरण उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे.

(हेही वाचा-Mhada : म्हाडा देणार ‘त्या’ ‘सदनिका भाडे तत्वावर ?)

अस्थिव्यंग शस्त्रक्रिया विभागाचे अत्याधुनिक शल्यक्रियागार ही एक काळाची असून सांधे बदल शस्त्रक्रिया आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेसारख्या जटिल शस्त्रक्रिया ही मोठी गरज लक्षात घेता अत्याधुनिक शल्यक्रियागार अर्थात Modular Orthopaedic Operation Theater बनवण्यात आले आहे. या विभागाशी  संलग्न असलेला ०८ रुग्णखाट  या अस्थिव्यंगशल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रियेपश्चात लागणारा अतिदक्षता विभागाचेही  गुरुवारी  लोकार्पण करण्यात येत आहे.
के. ई .एम रुग्णालय हे  २२५० रुग्णशय्यांची सोय असलेले असे सुसज्ज रुग्णालय असून या रुग्णालयात औषधशास्त्र शस्त्रक्रियागार विभाग, हृदयरोग विभाग, न्युरोसर्जरी विभाग, अनेस्थेशिया विभाग असे विविध अतिदक्षता विभाग आहे. या अतिदक्षता विभागामध्ये २१२ रुग्णशय्यांची उत्तम सोय आहे. या रुग्णालयात दरवर्षी ६५ हजारहून अधिक शस्त्रक्रिया करण्यात येतात. तसेच १८ लाखाहून अधिक बाह्यरुग्ण रुग्णसेवा घेतात. दररोज आंतररुग्णांची संख्या जवळपास १८५ इतकी आहे. एका वर्षामध्ये ६ हजारहून अधिक प्रसुती होतात.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=_ckVCvJ0M-k

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.