Jobs in Real Estate : ‘या’ क्षेत्रात महिन्याला सरासरी ८,५०० नोकऱ्यांची वाढ

Jobs in Real Estate : व्यवसायातील तेजीमुळे इथे विविध प्रकारच्या नोकऱ्यांची मागणी वाढत आहे 

108
Jobs in Real Estate : ‘या’ क्षेत्रात महिन्याला सरासरी ८,५०० नोकऱ्यांची वाढ
Jobs in Real Estate : ‘या’ क्षेत्रात महिन्याला सरासरी ८,५०० नोकऱ्यांची वाढ
  • ऋजुता लुकतुके

अलीकडच्या काळात घरांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जमीन खरेदी विक्रीचे व्यवहारात वाढ झाल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. तसेच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतायेत. या क्षेत्रात महिन्यात ८,५०० हून अधिक लोकांना रोजगार मिळत आहे. रिअल इस्टेट सल्लागार Anarock आणि उद्योग संस्था NAREDCO यांनी एक संयुक्त अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात ही माहिती देण्यात आलीय. (Jobs in Real Estate)

(हेही वाचा- KTM 125 Duke (2024) : केटीएम १२५ ड्युक ही नवीन स्ट्रीट फायटर आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल)

रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात तेजी असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं या क्षेत्रात रोजगाराच्या संधी दिवसेंदिवस वाढत आहेत. रेपो दराचा कोणताही परिणाम रिअल इस्टेट या क्षेत्रावर झालेला नाही. मागील १० वर्षाच्या अहवालानुसार, या क्षेत्रात दररोज  ८,५०० लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.  मागील १० वर्षाचा विचार केला तर या क्षेत्रानं तीन कोटीहून अधिक रोजगार निर्माण केले आहेत. (Jobs in Real Estate)

गृहनिर्माण क्षेत्रात दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. गेल्या काही काळात घरांच्या मागणीतही वाढ झालीय. याचा परिणाम रोजगात देखील वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली झालेल्या अनेक सुधारणांमुळं या क्षेत्रात वाढ होत असल्याची माहिती अहवालात देण्यात आलीय. सरकारच्या धोरणामुळं हे क्षेत्र अधिक मजबुतीकडं वाटचाल करत असल्याची माहिती अहवालत सांगण्यात आलीय. (Jobs in Real Estate)

(हेही वाचा- IPL 2024, Jake Fraser-McGurk : एका षटकात ५ षटकार ठोकणारा जेक फ्रेझर – मॅकगर्क कोण आहे?)

अहवालात दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण कर्मचाऱ्यांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा हा १८ टक्क्यांहून अधिक आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार,  २०१४ ते २०२३ या काळात २९.३२ लाख युनिट्स बांधले गेले. यातील २८.२७ लाख युनिट्सची विक्री झाली.  देशातील काही प्रमुख शहरांमध्ये घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झालीय. दिल्ली-एनसीआर, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद आणि पुणे या शहरात घरांच्या विक्रीत मोठी वाढ झालीय. (Jobs in Real Estate)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.