KTM 125 Duke (2024) : केटीएम १२५ ड्युक ही नवीन स्ट्रीट फायटर आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल

केटीएमच्या नवीन स्ट्रीट फायटर बाईकची का होतेय चर्चा?

204
KTM 125 Duke (2024) : केटीएम १२५ ड्युक ही नवीन स्ट्रीट फायटर आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल
KTM 125 Duke (2024) : केटीएम १२५ ड्युक ही नवीन स्ट्रीट फायटर आंतरराष्ट्रीय बाजारात दाखल
  • ऋजुता लुकतुके

स्ट्रीय फायटर बाईक बनवणं हा केटीएम या ऑस्ट्रियन कंपनीचा हातखंडा आहे. आणि सध्या त्यांनी आपल्या केटीएम ड्युक सीरिजमध्ये सुधारणा करत १२५ ड्युक (KTM 125 Duke 2024) ही बाईक बाजारात आणली आहे. यात डिझाईन मात्र पूर्णपणे बदललं आहे. तरुणांना आकर्षित करणारी नवीन रंगसंगती आणि आधुनिक डिझाईन याने ही बाईक सजली आहे. बाईकचं डिझाईन त्यामुळे अधिक धोटीव आणि शार्प आहे.

यात आधुनिक एलईडी दिवे आहेत. आणि हँडलच्या मध्यभागी टीएफटी काचेनं बनलेला मोठा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले ब्लूटूथच्या माध्यमातून मोबाईलला जोडला की, तुम्ही इन्फोटेनमेंटबरोबरच गुगल मॅपनाही जोडले जाता. बाकी चालकाच्या सुरक्षेसाठी यात एबीएस यंत्रणा आहे. शिवाय इंधनाच्या टाकीची क्षमता यात वाढवण्यात आली आहे.

(हेही वाचा – Jio, Airtel Rate Hike : लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्जचे दर वाढणार?)

विशेष म्हणजे आधुनिक बदल करताना कंपनीने आपल्या जुन्या ड्युक २५० आणि ३९० या गाड्यांचं हार्डवेअर १२५ ड्युकसाठी (KTM 125 Duke 2024) कायम ठेवलं आहे. ३२० मिमी फ्रंट डिस्क आणि २४० मिमी रेअर डिस्क नवीन बाईकमध्ये आहे. आणि तिचं वजन कमी करण्यासाठी चाकांचं डिझाईनिंग आणि धातू बदलण्यात आले आहेत. वेग वाढवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

या बाईकची स्पर्धा होंडा सीबी१२५ बरोबरच रॉयल एनफिल्ड ३५० तसंच बजाज पल्सर एनएस४०० यांच्याशी होणार आहे. केटीएम १२५ ड्युकची किंमत १,७९,००० रुपयांच्या आसपास सुरू होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.