IPL 2024, Jake Fraser-McGurk : एका षटकात ५ षटकार ठोकणारा जेक फ्रेझर – मॅकगर्क कोण आहे?

आयपीएल पदार्पणातच जेक फ्रेझरने २२ वर्ष जुना एबी डिव्हिविअर्सचा विक्रम मोडला आहे.

162
IPL 2024, Jake Fraser-McGurk : एका षटकात ५ षटकार ठोकणारा जेक फ्रेझर - मॅकगर्क कोण आहे?
IPL 2024, Jake Fraser-McGurk : एका षटकात ५ षटकार ठोकणारा जेक फ्रेझर - मॅकगर्क कोण आहे?
  • ऋजुता लुकतुके

दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा ६ गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सने घरच्या मैदानावर खेळताना १६७ धावा केल्या होत्या. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही कारण डेव्हिड वॉर्नर (David Warner) केवळ ८ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर पृथ्वी शॉने जबाबदारी स्वीकारली, पण मागील सामन्याप्रमाणे त्याला अर्धशतकही करता आले नाही. वॉर्नर २२ चेंडूत ३२ धावा करून माघारी परतला.

दिल्लीने सुरुवातीच्या षटकांत अतिशय संथ फलंदाजी केली, मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि आयपीएलमध्ये (IPL 2024) पदार्पण करणारा जेक फ्रेझर मॅकगर्कने (Jake Fraser-McGurk) स्फोटक शैलीत फलंदाजी करत लखनौच्या गोलंदाजांना धुळ चारली. एकीकडे पंतने २४ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. तर मॅकगर्कने ३५ चेंडूत ५५ धावा केल्या. त्याने २ चौकार आणि ५ षटकारही मारले. मॅकगर्कच्या या खेळीची चर्चा आता होऊ लागली आहे.

(हेही वाचा – Rahul Gandhi : आमचे सरकार येताच अग्निवीर योजना बंद करणार; राहुल गांधी यांची घोषणा)

जेक फ्रेझर मॅकगर्क (Jake Fraser-McGurk) त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. या २१ वर्षीय फलंदाजाने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक झळकावत दक्षिण अफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडला होता. जेक फ्रेझर मॅकगर्क (Jake Fraser-McGurk) या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने अवघ्या २९ चेंडूत शतक झळकावून क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले. त्याने आपल्या झंझावाती खेळीत १३ षटकार ठोकले. यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सने १८ जानेवारी २०१५ रोजी ३१ चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता.

जेक फ्रेझर मॅकगर्क (Jake Fraser-McGurk) देशांतर्गत क्रिकेटमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळतो.दिल्ली कॅपिटल्सने वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीच्या जागी जेक फ्रेझर मॅकगर्कचा आपल्या संघात समावेश केला आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी जखमी झाला होता, त्यानंतर त्याला आयपीएलमधून (IPL 2024) बाहेर व्हावे लागले होते. दिल्ली कॅपिटल्सने जेक फ्रेझर मॅकगर्कला (Jake Fraser-McGurk) 50 लाखांच्या किमतीत सामील केले. ऑस्ट्रेलियाकडून 2 वनडे खेळलेल्या जेक फ्रेजर मॅकगर्कच्या नावावर 51 धावा आहेत. पण हा फलंदाज टी-२० फॉरमॅटमध्ये झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.