आठवी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी, भारतीय पोस्टमध्ये भरती! 60 हजार रुपयांपर्यंत पगार

103

नोकरी शोधणा-यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय पोस्ट विभागात ग्रुप सी अंतर्गत पदभरती करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे आठवी पास उमेदवार सुद्धा या भरतीसाठी पात्र असणार आहेत. या भरतीद्वारे MV मेकॅनिक, MV इलेक्ट्रिशिअन,पेंटर,वेल्डर आणि कारपेंटर या रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

सात पदांची भरती

MV मेकॅनिक- 1 पद
MV इलेक्ट्रिशिअन- 2 पदं
पेंटर- 1 पद
वेल्डर- 1 पद
कारपेंटर- 2 पदं

(हेही वाचाः 40 महिन्यांत पहिल्यांदाच बँकांमध्ये रोख रक्कमेचा तुटवडा, काय आहे कारण?)

किती मिळणार पगार?

या सातही पदांसाठी 18 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र असतील. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 19 हजार 900 ते 63 हजार 200 रोपये पगार देण्यात येईल. ट्रेड टेस्टच्या माध्यमातून ही भरती करण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता

या ग्रुप सी पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांकडे ट्रेडमध्ये आयआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे आठवी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि किमान एका वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच एमपी मेकॅनिक पदासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.