झाशी : शोरूममध्ये लागलेल्या आगीवर १० तासांनी नियंत्रण; चार जणांचा होरपळून मृत्यू

101
झाशी : शोरूममध्ये लागलेल्या आगीवर १० तासांनी नियंत्रण; चार जणांचा होरपळून मृत्यू

देशात एकीकडे मुसळधार पाऊस, भूस्खलन, पूर , अपघात यांसारख्या घटना घडत असतांना झाशीमध्ये दोन इलेक्ट्रिक शोरूममध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सिपरी बाजारातील दोन इलेक्ट्रॉनिक शोरूमला सोमवारी (३ जुलै) संध्याकाळी आग लागली. ही आग इतकी भीषण होती की या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल १० तास लागले. अखेर रात्री उशिरा या आगी विझवण्यात यश आले. मात्र यामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या असिस्टंट मॅनेजर रजनी राजपूत यांच्यासह ४ जण जिवंत जळून खाक झाले. तर ७ जण जखमी झाले असून ३ तरुणांचा शोध सुरु आहे.

(हेही वाचा – अजित पवारांना समर्थन दिलेल्या आमदारांची यादी विधानभवनात पोहोचलीच नाही?)

आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर रात्री अडीच वाजता ही शोधमोहीम राबविण्यात आली. या अपघातात ७ जणांना वाचवण्यात यश आले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही ३ तरुण बेपत्ता आहेत. आग इतकी भीषण होती की मृतदेहांची ओळख पटवणे देखील कठीण झाले होते.

घटनास्थळापासून १० किलोमीटरपर्यंत ज्वाळा आणि धूर दिसत होते. ही आग विझवण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतील सुमारे ५० अग्निशमन दलाचा वापर करण्यात आला. आगीवर नियंत्रण मिळवता न आल्याने प्रशासनाकडून फौजफाटा मागवण्यात आला. डीएम रवींद्र कुमार यांनी अपघाताच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत.

आजूबाजूची २० कुटुंबे रात्रीच्या निवाऱ्यात स्थलांतरित झाली

भीषण आग पाहता दोन्ही शोरूमच्या शेजारील २० कुटुंबांना रात्रीच्या निवाऱ्यात हलवण्यात आले. तेथे त्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी पाण्याची गरज पाहून संपूर्ण वसाहतीत दहा तास पाणीपुरवठा सुरू होता. जेणेकरून पाण्याची समस्या उद्भवणार नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.