ITR Filling : अंतिम मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढविली; तीन महिने उलटूनही प्रक्रिया अद्याप ४० टक्क्यांपेक्षा कमी

ITR Filling : आयकर विवरणपत्र(ITR Filling) भरण्याकरिता केंद्र सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आयकर विवरणपत्र भरण्या(ITR Filling)च्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने करदात्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

230
ITR Filing 31 August 2026 : ३१ ऑगस्टपर्यंत आयटीआर भरा; व्यवसाय, फ्रीलान्स आणि व्यावसायिकांसाठी महत्त्वाची शेवटची तारीख

ITR Filling : आयकर विवरणपत्र(ITR Filling) भरण्याकरिता केंद्र सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आयकर विवरणपत्र भरण्या(ITR Filling)च्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याने करदात्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पासून वाढवून १५ सप्टेंबर २०२५ केली असली तरी अद्याप ४० टक्क्यांपेक्षा कमी विवरणपत्रां(ITR Filling)वरच प्रक्रिया झाली आहे.(ITR Filling)

आयटीआर प्रक्रियेतील दिरंगाईमुळे करदात्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३.२९ कोटी विवरणपत्रे दाखल झाली आहेत. त्यापैकी ३.१९ कोटी पडताळणी झाली असून केवळ १.१३ कोटी विवरणपत्रां(ITR Filling)वरच प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याचाच अर्थ, अजूनही मोठ्या संख्येने दाखल केलेली विवरणपत्रे प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.

(हेही वाचा Tariff War : अमेरिकेच्या निर्बंधांनंतर चीनने भारतासाठी बाजारपेठ उघडली; टॅरिफ लादण्यास विरोध )

आयटीआर प्रक्रियेतील विलंबामुळे अनेक करदात्यांचे परतावे अडकले आहेत. या विलंबामुळे करदात्यांना त्यांची आर्थिक नियोजन करणे कठीण झाले आहे. या समस्येचे मुख्य कारण म्हणजे आयकर विभागाच्या प्रणालीमध्ये झालेले मोठे तांत्रिक बदल आणि अनेक नवीन प्रणाली कार्यान्वित होण्यास लागणारा वेळ. आयकर विभागाच्या नवीनयूटिलिटीज आणि सॉफ्टवेअरमधील बदलांमुळे ही प्रक्रिया मंदावली आहे. विशेषतः ITR-5, ITR-6 ITR-7 या फॉर्म्ससाठी आवश्यक असलेलीयूटिलिटीजअजूनही पूर्णपणे उपलब्ध नसल्यामुळे अनेक व्यावसायिक संस्थांना विवरणपत्र भरण्यात अडचणी येत आहेत.(ITR Filling)

सरकारने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी जर प्रक्रिया अशीच संथ राहिली, तर परतावे मिळण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, करदात्यांनी वेळोवेळी आयकर विभागाच्या संकेतस्थळावर (website) जाऊन आपल्या विवरणपत्राची स्थिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(ITR Filling)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.