Iran Israel War : इराणमधील २९० भारतीयांची तुकडी सुरक्षितरित्या मायदेशी परत

Iran Israel War : शनिवारी सकाळी अश्गाबातहून एक विशेष विमान नवी दिल्लीत पोहोचले. भारताने आतापर्यंत २००३ जणांना परत आणले आहे.

155

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. (Iran Israel War) युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी चालवले जाणारे ऑपरेशन सिंधू (Operation sindhu) सुरूच आहे. सोमवार, (दि. २३) रात्री महान एअरचे एक विशेष विमान २९० प्रवाशांसह इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) उतरले.

(हेही वाचा – Ind vs Eng, Headingley Test : भारताकडून एकाच कसोटीत पाच शतकं झळकवण्याचा विक्रम)

दिल्लीला पोहोचलेल्या २९० प्रवाशांमध्ये श्रीलंकेची एक महिला फातिमा इमान देखील आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजता नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या विशेष विमानाने २९० भारतीय नागरिक आणि एका श्रीलंकेच्या नागरिकाला बाहेर काढण्यात आले.

भारत सरकारचे आभार मानताना फातिमा म्हणाली की, ती ज्या विद्यापीठात शिक्षण घेत आहे तिथे अनेक भारतीय विद्यार्थी आहेत. भारतीय दूतावास आणि भारत सरकारने केलेल्या व्यवस्थेचे तिने कौतुक केले. पहिले विमान शुक्रवारी(दि.२०) रात्री उशिरा २९० भारतीयांसह नवी दिल्लीत उतरले आणि दुसरे विमान शनिवार, दि.२१ जूनच्या दुपारी ३१० भारतीयांसह उतरले. गुरुवारी येरेवनहून आणखी एक विमान आले. शनिवारी सकाळी अश्गाबातहून एक विशेष विमान नवी दिल्लीत पोहोचले. भारताने आतापर्यंत २००३ जणांना परत आणले आहे. (Iran Israel War)

दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रविराम झाला आहे. हे युद्ध लांबले असते, तर ते तिन्ही बाजूंसाठी विनाशकारी ठरले असते. इराणची हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense System) जवळपास नष्ट झाली होती. त्यांच्या अणु-केंद्रांवर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही खचला होता. इस्रायलच्या अडचणीही आता वाढू लागल्या होत्या. इराणी क्षेपणास्त्रे आता त्यांच्या इच्छेनुसार तिथे घुसत होती. अशा परिस्थितीत अमेरिकेसाठीही परिस्थिती कठीण झाली असती. इराणने कतारमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केल्यानंतर अखेर शस्त्रविराम करण्यात आला आहे. (Iran Israel War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.