Irshalwadi Landslides : मुंबई महापालिकेची यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांचा बचाव कार्यात सहभाग

102
Irshalwadi Landslides : मुंबई महापालिकेची यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांचा बचाव कार्यात सहभाग
Irshalwadi Landslides : मुंबई महापालिकेची यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांचा बचाव कार्यात सहभाग

रायगड जिल्ह्यातील खोपोली तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी वस्तीवर कोसळलेल्या दरड दुर्घटनेनंतर घटनास्थळी मदत व बचावकार्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून मशिनरी सह कर्मचारी वर्गासह मनुष्यबळ पाठवण्यात आले आहेत. याबाबतच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर ही सर्व यंत्रणा रवाना करत प्रत्यक्ष बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

New Project 2023 07 20T210716.783

(हेही वाचा – Manipur Video : मणिपूर अत्याचारातील महिलांची आली प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘आम्हाला पोलिसांनीच…’)

राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार एकूण तीन बॉब कॅट संयंत्र घन कचरा व्यवस्थापन विभागाद्वारे रवाना झाले आहेत. माहीम रेतीबंदर, मुलुंड आणि जुहू येथून प्रत्येकी एक याप्रमाणे ही तीन वाहने रवाना झाली आहेत. तसेच, पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत वांद्रे येथून पोकलेन संयंत्र रवाना करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.