IndiGo Passenger यांच्यावर जमिनीवर बसून जेवण्याची वेळ; व्हिडीओ वायरल

एका वापरकर्त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला 12 तासांच्या विलंबानंतर मुंबईकडे वळवण्यात आले.

196
Show Cause to Indigo : प्रवाशांनी रनवेवर जेवण घेतल्यानंतर इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस
Show Cause to Indigo : प्रवाशांनी रनवेवर जेवण घेतल्यानंतर इंडिगो आणि मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस

गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला (IndiGo Passenger) हवामानाच्या बदलामुळे मुंबईकडे वळवण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळावर प्रवासी जमिनीवर बसून जेवतांना दिसले. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंडिगोने मागितली माफी –

१४ जानेवारी रोजी गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E2195 विमानाच्या (IndiGo Passenger) घटनेबाबत आम्हाला माहिती आहे. धुक्यामुळे दिल्लीत दृश्यमानता कमी असल्यामुळे हे विमान मुंबईकडे वळवण्यात आले. आम्ही आमच्या ग्राहकांची मनापासून माफी मागतो आणि सध्याच्या घटनेचा तपास करत आहोत.” असे कंपनीने सांगितले आहे.

(हेही वाचा – Nylon Manja Accident : नॉयलॉन मांजा प्रकरणी मुंबईत ९२ गुन्हे दाखल)

काय आहे या व्हिडिओमध्ये? 

या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (IndiGo Passenger) दिसत आहे की ही रात्रीची वेळ आहे, जिथे इंडिगोचे विमान (IndiGo Passenger) उभे आहे, तर काही लोक जवळच जमिनीवर बसले आहेत. कोणाच्या हातात फोन आहे, कोणी एकमेकांशी बोलत आहे तर काही प्रवाशी जेवत आहेत.

डीजीसीएकडून सर्व विमान कंपन्यांना सूचना – 

दरम्यान, विमानचालन नियामक डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना धुक्याशी संबंधित अडथळ्यांदरम्यान उड्डाण विलंबासंदर्भात अचूक ‘रिअल-टाइम’ माहिती सामायिक करण्यास सांगितले आहे. डीजीसीएने विमान कंपनीला (IndiGo Passenger) विमानतळावर वाट पाहणाऱ्या प्रवाशांना बदलेल्या वेळांची संपूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे.

(हेही वाचा – Central Railway : नागपूरमार्गे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द, वेळापत्रक पहा)

इंडिगोच्या प्रवाशाने पायलटला मारहाण केल्याचा आरोप –

सध्या इंडिगोच्या (IndiGo Passenger) विमानातील एका प्रवाशाचा धक्कादायक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो विमानाच्या पायलटला मारहाण करताना दिसत आहे. रविवारी (१४ जानेवारी) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगोच्या ए20एन विमानाला १० तासांपेक्षा जास्त उशीर झाला.

उड्डाणाला उशीर झाल्याची घोषणा करत असताना एका प्रवाशाने पायलटवर हल्ला (IndiGo Passenger) केला. त्यानंतर पोलिसांनी प्रवाशाला अटक केली. यापूर्वी शनिवारी (१३ जानेवारी) मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला खराब हवामानामुळे बांगलादेशातील ढाकाकडे वळवण्यात आले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.