Indian Forex Reserves : भारतीय परकीय गंगाजळी २० महिन्यांतील उच्चांकावर

भारतीय परकीय गंगाजळीत सलग पाच आठवडे वाढ झाली आहे आणि पाचव्या आठवड्यात त्यात ९ अब्जांची वाढ झाली असून ती ६१५.९७१ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे.

119
Indian Forex Reserves : भारतीय परकीय गंगाजळी २० महिन्यांतील उच्चांकावर
Indian Forex Reserves : भारतीय परकीय गंगाजळी २० महिन्यांतील उच्चांकावर
  • ऋजुता लुकतुके

या घडीला भारतीय परकीय गंगाजळीत ६१५.९७१ अब्ज अमेरिकन डॉलर आहेत. (Indian Forex Reserves)

भारतीय परकीय गंगाजळीत सलग पाच आठवडे वाढ झाली आहे आणि पाचव्या आठवड्यात त्यात ९ अब्जांची वाढ झाली असून ती ६१५.९७१ अब्ज अमेरिकन डॉलरवर पोहोचली आहे. मागच्या २० महिन्यातील हा उच्चांक आहे. रिझर्व्ह बँकेनं नवीन आकडे जाहीर केले आहेत. (Indian Forex Reserves)

यामध्ये मोठा वाटा हा भारतातील कर्जरोखे बाजार आणि शेअर बाजारांनी उचलला आहे. परकीय गुंतवणूकदार संस्थांनी या आठवड्यात भारतीय बाजारांत ९.१ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे. यापूर्वीच्या आठवड्यात ही गुंतवणूक २ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. (Indian Forex Reserves)

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचं मूल्य स्थिर करण्यासाठी रिझर्व्ह बँक डॉलर विकत घेत असते. शिवाय आधीपासून तिजोरीत असलेल्या परकीय चलनाचं मूल्य कमी जास्त झालं की, त्यानुसार परकीय गंगाजळीही कमी जास्त होत असते. पण, यावेळी रुपयाचं मूल्यही अमेरिकन डॉलरच्या तुलनेत स्थिर होतं. शिवाय परदेशातून भारतीय बाजारांत गुंतवणूकही झाली. त्यामुळे परकीय गंगाजळीत ही वाढ दिसून आली आहे. (Indian Forex Reserves)

(हेही वाचा – Muslim : मुस्लिम तरुणी सनाने विवाह केला दिनेशसोबत; तरुणीच्या कुटुंबाकडून धमक्या; तरुणीने थेट मुख्यमंत्री योगींकडे मागितली मदत)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत भारताने केलेली गुंतवणूकही परकीय गंगाजळीत धरली जाते. पण, या आठवड्यात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८३ रुपयांच्याही खाली गेला. २५ ऑगस्टला तो सगळ्यात वर म्हणजे ८२.९४ वर होता. त्याचा परिणामही झाला आहे. (Indian Forex Reserves)

त्यानंतर मात्र लाल समुद्रात निर्माण झालेल्या हौती बंडखोरांच्या हल्ल्याच्या भीतीमुळे कच्च तेल महाग होतंय आणि असं झालं की, तेलासाठी भारताला जास्त परकीय चलन खर्च करावं लागतं आणि आपली गंगाजळी आटते. त्यामुळे पुढील आठवड्यात परकीय गंगाजळीत घट बघायला मिळेल असा अंदाज आहे. (Indian Forex Reserves)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.