Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजपात येणार; भाजपच्या खासदाराच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

204

लोकसभेची २०२४ ची निवडणूक जशी जवळ येऊ लागली तशी भाजपात आयारामांची चर्चा सुरु झाली आहे. अशीच चर्चा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्याबाबत सुरु झाली आहे. भाजपाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) लवकरच भाजपात दाखल होणार असून त्यांची ताकद वाढणार आहे, असे म्हटले आहे.

(हेही वाचा Ghar Wapasi : छत्तीसगडमध्ये २४ डिसेंबरला १०१ कुटुंबे स्वीकारणार हिंदू धर्म)

भाजपचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक नेते रांगेत

नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा दावा केला आहे. यासाठी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दाखला दिला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी मुखेड व नांदेड शहरात 100 सुपर वॉरियर्सची बैठक घेतली. त्यात त्यांनी अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपत येण्यास उत्सुक असल्याचे सांगितले, असा दावा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे. भाजपचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक नेते रांगेत उभे आहेत. त्यांनी काही काँग्रेस नेत्यांचा उल्लेख केला. ही बाब जुनी आहे. अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याची 150 कोटींची थकहमी मागच्या सरकारने माफ केली नाही. पण ते भाजप नेत्यांकडे गेले असता महायुती सरकारने त्यांना थकहमी दिली. यावरून सर्वकाही लक्षात येते. अशोक चव्हाण  (Ashok Chavan) सत्तेसाठी भाजपत येऊ शकतात., असे खासदार चिखलीकर म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.