Mumbai Airport : फ्रान्समध्ये अडकून पडलेल्या २७६ भारतीयांची सुटका, ४ दिवसांनंतर विमान मुंबईत परतले

मानवी तस्करीच्या संशयावरून हे विमान फ्रान्समध्ये अडकून पडले होते.

176
Mumbai Airport: हवाई क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी केंद्र सरकारने उचलली पावले
Mumbai Airport: हवाई क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी केंद्र सरकारने उचलली पावले

फ्रान्समध्ये अडकून पडलेले विमान मंगळवारी पहाटे मुंबईत (Mumbai Airport) उतरले. गेल्या ४ दिवसांपासून विमानात अडकून पडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला. मानवी तस्करीच्या संशयावरून हे विमान फ्रान्समध्ये अडकून पडले होते. या विमानात एकूण ३०३ भारतीय प्रवासी होते.

मंगळवारी (२६ डिसेंबर) पहाटे हे विमान मुंबईत उतरले. या प्रवाशांना भारतात परत आणण्याचे भारत सरकारकडून करण्यात आलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, फ्रान्समध्ये अडकून पडलेल्या विमानामध्ये ३०३ प्रवासी भारतीय होते. यापैकी २७६ भारतीय मुंबईत परतले आहेत,तर दोन अल्पवयीन प्रवाशांसह २५ प्रवासी फ्रान्समध्येच थांबून आहेत. त्यांनी फ्रान्सकडे आश्रयासाठी अर्ज केला आहे.

२३ डिसेंबर रोजी दुबई येथून भारतीय नागरिकांना निकाग्वारकडे जाण्यासाठी हे विमान निघाल होतं, मात्र तांत्रिक दुरुस्तीसाठी विमान फ्रान्सच्या वॅट्री विमानतळावर उतरवण्यात आलं. या विमानाचा वापर मानवी तस्करीसाठी केला जात असल्याचा संशय फ्रान्सच्या तपास यंत्रणांना आला होता. त्यामुळे फ्रान्सच्या सुरक्षा यंत्रणांनी विमान ताब्यात घेत तपास सुरू केला. सर्व प्रवाशांना विमानतळावरील रिसेप्शन हॉलमध्ये थांबण्यात आलं होतं.

फ्रान्समध्ये भारतीय विमान रोखताच दिल्लीपासून पॅरिसपर्यंत मोठी खळबळ उडाली. होती. या विमानाला भारतात आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू होते. फ्रान्सच्या न्यायालयाच्या आदेशानंतर या विमानाला भारताकडे उड्डाण भरण्याची परवानगी देण्यात आली. ४ न्यायाधीधांनी ताब्यात घेतलेल्या प्रवाशांची चौकशी केल्यानंतर विमान सोडण्याचे आदेश दिले. सोमवारी सकाळी फ्रान्समधील वॉट्री विमानतळावरून या विमानाने उड्डाण केले आणि मंगळवारी पहाटे २७६ प्रवाशांची सुटका झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.