TMKOC : ’तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधले तारक मेहता आहेत तरी कोण?

2484
TMKOC : ’तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधले तारक मेहता आहेत तरी कोण?
TMKOC : ’तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधले तारक मेहता आहेत तरी कोण?

तारक जानुभाई मेहता हे एक भारतीय स्तंभलेखक, विनोदवीर, लेखक आणि नाटककार होते. ‘दुनिया ने उंधा चस्मा’ या स्तंभ लेखनामुळे ते खूप प्रसिद्ध झाले होते. त्यांनी गुजराती रंगभूमीची मनापासून सेवा केली. तारक मेहता यांचा जन्म २६ डिसेंबर १९२९ रोजी अहमदाबादमध्ये झाला. ते गुजराती जैन समाजाचे होते.

Tarak Mehta 01

त्यांची दोन लग्नं झाली होती. पहिल्या पत्नीचे नाव इला आणि दुसर्‍या पत्नीचे नाव इंदू असे होते. १९७१ पहिल्यांदा त्यांचा विनोदी साप्ताहिक स्तंभ चित्रलेखामध्ये प्रकाशित झाला. या स्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे समकालीन समस्या त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून मांडल्या. विनोदाच्या अंगाने लिहिलेले जीवनाचे सत्य लोकांना खूप भावले.

(हेही वाचा-Henry Miller : अमेरिकन कादंबरीकार हेनरी मिलर)

त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी ८० पुस्तके लिहिली. मुंबई मे मेहमान-यजमान परेशान, मेहता ना मोंघेरा मेहमान, पातू टपोरी, सालो सुंदरलाल, कैसे ये जोडी मिलाये राम, चंपू-सुलू नी जुगलबंदी, तारक मेहता ना टपुडो, तारक मेहता ना उंधा चस्मा ही त्यांच्या प्रमुख पुस्तकांची नावे आहेत. त्याचबरोबर जोजो हसी ना काढता, आए तो एमज चाले, तारक मेहता ना एकांकिओ अशी नाटके देखील त्यांनी लिहिली आहेत.

२००८ मध्ये सब टिव्हीवर त्यांच्या स्तंभावर आधारित ’तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आली. जी आजतागायत सुरु आहे. अभिनेता शैलेश लोढा यांनी २०२२ पर्यंत या मालिकेत तारक मेहता यांची भूमिका केली होती. मेहता यांना २०१५ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुजरात साहित्य अकादमीने त्यांना २०११ मध्ये साहित्य गौरव पुरस्कार आणि २०१७ मध्ये रमणलाल नीलकंठ हास्य परितोषिक (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.