Green Energy : भारत 2030 पूर्वीच गाठणार हरित उर्जेचे लक्ष्य – अजय माथुर

इलेक्ट्रिक बॅटरींच्या किंमती 2025 सालापर्यंत कमी होऊ शकतात

94
Green Energy : भारत 2030 पूर्वीच गाठणार हरित उर्जेचे लक्ष्य - अजय माथुर
Green Energy : भारत 2030 पूर्वीच गाठणार हरित उर्जेचे लक्ष्य - अजय माथुर

इलेक्ट्रिक बॅटरींच्या किंमती 2025 सालापर्यंत कमी होऊ शकतात. यामुळेच 2030 पूर्वी भारत आपले 500 GW अक्षय्य उर्जेचे (Green Energy) लक्ष्य गाठू शकणार आहे. 2030 सालापर्यंत देशाची हरित उर्जा क्षमता ही 500 गिगावॅट करण्याचे लक्ष्य भारताने डोळ्यासमोर ठेवले आहे. हे लक्ष्य वेळेपूर्वीच पूर्ण होईल, असे मत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे संचालक अजय माथुर यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान मोदींनी 2021 साली ग्लासगो क्लायमेट परिषदेमध्ये दिलेल्या पाच वचनांपैकी हे एक वचन आहे, असेही ते म्हणाले. अजय माथुर हे पंतप्रधान मोदी यांच्या हवामान बदलाबद्दल असणाऱ्या परिषदेचे सदस्य देखील आहेत.

(हेही वाचा – Cyber Fraud : केवायसीसाठी फोन आला आणि तब्बल २८ व्यवहारांद्वारे बँक खाते रिकामे, वाचा काय घडले…)

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अजय माथुर म्हणाले की, पर्यावरणासाठी जागतिक स्तरावर होणाऱ्या निधीचे वाटप हे असमान आहे. सौर उर्जेसाठीची 70 टक्के गुंतवणूक ही चीन आणि इतर श्रीमंत देशांमध्ये होते. आफ्रिकेकडे क्षमता असूनही तिकडे केवळ 4 टक्के गुंतवणूक होते. आफ्रिका आणि अशाच इतर देशांमध्ये गुंतवणूक न झाल्यास, भविष्यात मोठे नुकसान होऊ शकतं. त्यामुळेच जी-20 अध्यक्षपद आपल्याकडे असताना, जागतिक बँकांकडून या देशांना सौरउर्जेसाठी (Green Energy) कर्ज मिळावे यासाठी भारत प्रयत्न करेल.

अपारंपरिक उर्जेबाबत गुंतवणूक करण्यालाही प्राधान्य

G20 परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यामुळे, या कालावधीत बहुस्तरीय बँकांच्या यंत्रणेत सुधारणा घडवून आणण्यासाठी भारत प्रयत्न करेल. यासोबतच, अपारंपरिक उर्जेबाबत गुंतवणूक करण्यालाही प्राधान्य दिलं जात आहे. सोबतच, G20 परिषदेसाठी भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला देखील निमंत्रित केले आहे.

बॅटरींच्या किंमती कमी झाल्यामुळे, 500 GW सौरउर्जा (Green Energy) स्टोअर करण्यासाठी भरपूर प्रमाणात बॅटरी उपलब्ध होऊ शकतात. बॅटरी टेक्नॉलॉजीमध्ये होणारी प्रगती, आणि कंपन्यांमध्ये वाढलेली स्पर्धा या कारणांमुळे बॅटरींच्या किंमती भविष्यात कमी होऊ शकतात. हे येत्या २ वर्षांमध्येच होईल. सोबतच बॅटरी बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमतही कमी होत आहे आणि विविध प्रकारच्या बॅटरी तयार होत आहेत. यामुळे देखील बॅटरीज स्वस्त होऊ शकतात, असा दावा माथूर यांनी केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.