India Ship Hijack : हुथी बंडखोरांकडून भारतात येणाऱ्या जहाजाचे अपहरण; इस्रायलचे आरोप कुणावर ?

113
India Ship Hijack : हुथी बंडखोरांकडून भारतात येणाऱ्या जहाजाचे अपहरण; इस्रायलचे आरोप कुणावर ?
India Ship Hijack : हुथी बंडखोरांकडून भारतात येणाऱ्या जहाजाचे अपहरण; इस्रायलचे आरोप कुणावर ?

येमेनच्या हुथी मिलिशिया बंडखोरांनी तुर्कस्तानहून भारतात येणाऱ्या एका जहाजाचे रविवार, २० नोव्हेंबर रोजी अपहरण केले. (India Ship Hijack) लाल समुद्रात ओलीस ठेवलेल्या या मालवाहू जहाजाचे नाव गॅलेक्सी लीडर असून त्यात 25 क्रू मेंबर आहेत. या घटनेपूर्वी हुथी गटाने इस्रायली जहाजांवर हल्ले करण्याचा इशारा दिला होता. हुथी बंडखोरांच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्रायलच्या वतीने जाणाऱ्या सर्व जहाजांना लक्ष्य केले जाईल. (India Ship Hijack)

(हेही वाचा – Central Railway: मध्य रेल्वेकडून ख्रिसमस भेट! मुंबई-मंगळुरू आणि करमाली दरम्यान 16 विशेष गाड्या)

बहामासच्या ध्वजाखाली जाणारे जहाज ब्रिटीश कंपनीच्या नावावर नोंदणीकृत आहे. इस्रायली उद्योगपती अब्राहम उंगार हे त्याचे आंशिक भागधारक आहेत. सध्या ते एका जपानी कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आले होते, असे इस्रायल डिफेन्स फोर्सेसने स्पष्ट केले आहे.

हे दहशतवादी कृत्य – नेतन्याहू

हा इराणचा आंतरराष्ट्रीय जहाजावरील हल्ला आहे. इराणचे (Iran) हे दहशतवादी कृत्य आहे. मुक्त जगाच्या लोकांवर हा मोठा हल्ला आहे. याचा परिणाम जगातील शिपिंग लाईन्सवरही होईल, अशा शब्दांत  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे. (India Ship Hijack)

(हेही वाचा – Balasaheb Thackeray Memorial : स्मृतिस्थळावरील राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस)

इस्रायलने (Israel) हे जहाज त्यांचे नसून तुर्कीचे असल्याचे म्हटले आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेन, बल्गेरिया, फिलिपाइन्स आणि मेक्सिकोचे नागरिक या जहाजावर आहेत. या  जहाजावर एकही इस्रायली नागरिक नसल्याचे समोर आले आहे.

कोण आहेत हुथी बंडखोर ?

येमेनमध्ये 2014 मध्ये शिया-सुन्नी वादातून गृहयुद्ध सुरू झाले. 2014 मध्ये शिया बंडखोरांनी सुन्नी सरकारविरोधात आघाडी उघडली होती. त्या वेळी राष्ट्रपती अब्दराब्बू मन्सूर हादी हे होते. अरब स्प्रिंगनंतर दीर्घकाळ सत्तेत असलेले माजी अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह यांच्याकडून फेब्रुवारी 2012 मध्ये हादीने सत्ता हस्तगत केली. त्याच वेळी, सैन्यात फूट पडली आणि फुटीरतावादी हुथी दक्षिणेकडे जमले. (India Ship Hijack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.