Dadar Railway Station : दादरला या आणि नाक-तोंड आपटून घ्या

जिन्यावरील पायऱ्यांच्या लाद्या उखडल्या गेल्या असून अनेक पायऱ्यांच्या स्टिल पट्टीही निखळल्या आहेत

164
Dadar Railway Station : दादरला या आणि नाक-तोंड आपटून घ्या
Dadar Railway Station : दादरला या आणि नाक-तोंड आपटून घ्या

सचिन धानजी, मुंबई

एका बाजूला जी २० शिखर परिषदेसाठी मुंबईत येणाऱ्या शिष्टमंडळाचे स्वागत करण्यासाठी मुंबई सुशोभिकरणावर भर देण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे पायाभूत सेवा-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. दादर पश्चिम (Dadar Railway Station) येथील पूर्व आणि पश्चिम दिशा जोडल्या जाणाऱ्या पादचारी पुलावरील पश्चिम दिशेला असणाऱ्या जिन्यावरील पायऱ्यांच्या लाद्या उखडल्या गेल्या असून अनेक पायऱ्यांच्या स्टिल पट्टीही निखळल्या आहेत. त्यामुळे या पादचारी पुलाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना या तुटलेल्या लाद्या आणि निखळलेल्या स्टिल पट्टी यामुळे अडकून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तसेच पावसाळ्यात या लाद्यांवर पाय पडून अंगावर चिखलाचाही अभिषेक होत असल्याने दादरला या आणि नाक तोंड आपटून घ्या, असेच म्हणण्याची वेळ रेल्वे प्रवाशांसह खरेदीला येणाऱ्या नागरिकांवर आली आहे.

New Project 71 3

(हेही वाचा – Ranjit Savarkar : रणजित सावरकर यांच्या स्वागताला अमरावती नगरी सजली)

दादर पूर्व आणि दादर पश्चिम दिशा जोडणाऱ्या पादचारी पुलाचा पश्चिम दिशेला फुलमार्केट येथील जिन्याच्या भागावरील पायऱ्या आणि रेल्वे स्थानकावरून (Dadar Railway Station) उतरणारी पायवाट आदींवरील लाद्या मागील अनेक महिन्यांपासून उखडलेल्या असून या उखडलेल्या लाद्यांची सुधारणा करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या जी उत्तर विभाग आणि पूल विभागाच्या वतीने पावसाळ्यापूर्वीच करण्यात आला नाही. परिणामी पावसाळ्यात या तुटलेल्या लाद्यांमुळे अनेकदा प्रवाशांना ठेच लागून पडण्याचे प्रकार घडत आहेत.

New Project 73 3

हे पादचारी पूल पूर्वेला दादर कैलाश लस्सी येथे एक जिना उतरतो, तर दुसरा जिना दादर फुल मार्केट येथे केशवसूत उड्डाणपुलाच्या शेजारी उतरतो. या पश्चिम दिशेला एक जिना असून रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरून बाहेर पडण्यासाठी उतरणीचा मार्ग आहे. या जिन्याचा आणि उतरण मार्गाचे नुतनकरणी सन २०१६-१७ मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर या पुलाच्या जिन्याच्या अनेक पायऱ्यांवरील लाद्या तुटून गेल्या आहेत. अनेक पायऱ्यांच्या लाद्या उखडल्या गेल्या आहे, त्यामुळे लाद्या उखडून गेल्याने पायऱ्यांच्या पुढील बाजूस लावण्यात आलेल्या स्टिल पट्टीचा भाग हा पादचाऱ्यांसाठी धोक्याचा बनला आहे. या पट्टीला अनेदा पाय अडकून खाली पडण्याचे प्रकार घडत आहे. असेच प्रकार बाजूच्या उतरणीच्या मार्गावरील लाद्या उखडल्याने होत आहे.

New Project 72 3

त्यामुळे रेल्वे स्थानकाला (Dadar Railway Station) जोडून असलेल्या या पादचारी पुलाच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही पूल विभागाची असून पूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा या बाबींकडे लक्षच नाही. दादर पश्चिमेला दरदिवशी लाखो रेल्वे प्रवासी, तसेच खरेदीसाठी लोक येत असतात. त्यामुळे यासर्वांना या पुलावरील जिन्यावर जाता – येताना प्रसाद मिळत आहे. त्यामुळे या पुलावरून पडून कोणी जायबंदी झाल्यानंतर किंवा मोठी दुखापत होऊ दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल प्रवासी आणि खरेदीला येणाऱ्या नागरिकांकडून केला जात आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.