Income Tax : देशातील एक लाख लोकांना इन्कम टॅक्सची नोटीस

135
Income Tax : देशातील एक लाख लोकांना इन्कम टॅक्सची नोटीस

आयकर विभागाकडून (Income Tax) इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल भरण्यात गडबड करणाऱ्या एक लाख लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर दिनाच्या कार्यक्रमात ही माहिती दिली.

(हेही वाचा – Buldhana ST Bus Accident : ब्रेक फेल झाल्याने बस घाटात पलटली; मोठा अनर्थ टळला)

याबाबत सीतारामन यांनी सांगितले की, एक लाख लोकांना आयकराची (Income Tax) नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्या लोकांनी रिटर्न्समध्ये गडबड केली आहे त्यांच्यावर आयकर विभागाने दंडुका उभारला गेला आहे. आगामी मार्च २०२४ पर्यंत या सर्व प्रकरणांचे निराकरण केले जाईल. अर्थमंत्र्यांच्या मते आयकर विभागाने या नोटीशीचे काम जलद केले आहे. आगामी काळात त्यात तेजी दिसेल. कर विभागाकडून पाठवण्यात येणाऱ्या नोटीशी प्रकरणी पारदर्शी आणि जबाबदारीने व्यवहार केला जाईल.

गेल्या वर्षी आयकर रिटर्न (Income Tax) प्रोसेसिंगसाठी २६ दिवसांचा लागणारा अवधी आता केवळ १६ दिवसांवर आला आहे. आयकर विभागाने करदात्यांना अनेक सवलती दिल्या आहेत. किंबहुना ही किचकट प्रक्रिया सोप्पी झाल्याने रिटर्न्स फाईल करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. येणाऱ्या काळात त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२२ – २३ साठी आतापर्यंत ४ कोटींहून अधिक आयकर रिटर्न्स दाखल करण्यात आले आहेत. यातील निम्म्यापेक्षा अधिक आयटीआरची पडताळणी पूर्ण झाली आहे. इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाने आतापर्यंत ८० लाख रिफंड जारी केले आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.