Learning Marathi in America : अमेरिकेमध्ये भारतीय मुले गिरवतात मराठीचे धडे

मराठी जोडप्यांच्या मुला-मुलींना मराठी बोलता येत नाही. याची अनेकांना् खंत आहे. आणि यावरच तोडगा म्हणुन अमेरिकेत स्थायिक असलेल्या स्वाती कुलकर्णी यांनी तेथील भारतीय मुला-मुलींना मराठी शिकविण्याचा ध्यास घेतला आहे.

176
Learning Marathi in America : अमेरिकेमध्ये भारतीय मुले गिरवतात मराठीचे धडे
Learning Marathi in America : अमेरिकेमध्ये भारतीय मुले गिरवतात मराठीचे धडे

‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी…’, मराठी भाषेचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाच्या मनात हा असतोच. मात्र परदेशगमनामुळे अनेक मराठी जोडप्यांच्या मुला-मुलींना मराठी बोलता येत नाही याची अनेकांना खंत आहे. यावरच तोडगा म्हणुन अमेरिकेत (America) स्थायिक असलेल्या स्वाती कुलकर्णी यांनी तेथील भारतीय मुला-मुलींना मराठी शिकविण्याचा ध्यास घेतला आहे. (Learning Marathi in America )

अ‍ॅशबर्न ही मराठी शाळा केली सुरू 

मराठी भाषेचा (Marathi Language) सगळ्यांना अभिमान असणे गरजेचे आहे. अशीच जागृती आपल्या पाल्यांमध्ये असावी असे भारतातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनेक पालकांना वाटते. यासाठीच कुलकर्णी व काही जणांच्या ग्रुपने मिळुन अमेरिकेत मराठी मंडळाची स्थापन केली आहे. याच माध्यमातुन तेथे अ‍ॅशबर्न ही मराठी शाळा(Marathi School) त्यांनी सुरु केली आहे. मराठी भाषा आपल्या मुलांना यावी अशी इच्छा असणारे अनेक पालक आहेत. ते या शाळेत मुलांना पाठवत आहेत. तेथे प्राथमिक स्तरावरील मराठी शिकविले जाते. ज्यात मराठी अक्षरांची ओळख तसेच बोलणे, वाचणे शिकविले जाते. येथे परीक्षा घेतल्या जातात आणि यासाठी आम्हाला पुण्यातील भारती विद्यापीठाने या मुलांसाठी खास अभ्यासक्रम बनवून दिला आहे त्याच प्रमाणे आम्ही त्यांना शिकवतो, असे स्वाती कुलकर्णी यांनी सांगितले. या मुलांनी सोडविलेले पेपर तपासण्यासाठी पुण्यात पाठविले जातात. (Learning Marathi in America)

(हेही वाचा : Survey on Namo App : तिकीट देण्यापूर्वी नमो ॲप करणार सर्वे ; खासदारांचे टेन्शन वाढलं)

मातृभाषेची जाण असणे हा प्रमुख उद्देश

मुळात म्हणजे या मुलांना आपल्या मातृभाषेची जाण असावी हा त्यामागचा प्रमुख उद्देश असल्याचे स्वाती कुलकर्णी यांनी सांगितले. तर मी यामध्ये कशी काय रुजू झाले याबाबत सांगताना त्या म्हणाल्या की, माझा मोठा मुलगा मल्हार हा लहानपणी खुप अस्खलित मराठी बोलायचा आणि त्याचे आम्हाला खुप कौतुक होते. मात्र जसा तो मोठा झाला तेव्हा तो फार कमी मराठी बोलु लागला याचे मला दु:ख झाले. माझ्या मुलांना मराठी यायला हवे अशी माझी इच्छा होती. तेव्हा मला आपण या मुलांसाठी शाळा सुरु करावी असे वाटले. नतर आम्ही आमच्या मराठी मंडळाच्या माध्यमातून ही शाळा सुरु केली.

स्वाती या मुळच्या अमरावतीच्या असुन लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या आहेत. त्या स्वतः सॉफ्टवेर इंजिनीअर आहेत. मात्र या उपक्रमाचे अमेरिकेतील अनेक मराठी भाषिकांकडून कौतुक होत आहे आणि सध्या पंचवीस मुले आमच्या शाळेत मराठी शिकण्यास येत असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.