Nashik Municipal Corporation : अनधिकृतपणे झाडे तोडाल तर थेट जावे लागेल कोर्टात

परवानगी न घेताच वृक्षतोड केली जात असल्याने आता आक्रमक पवित्रा घेत थेट न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

274
Nashik Municipal Corporation : अनधिकृतपणे झाडे तोडाल तर थेट जावे लागेल कोर्टात
Nashik Municipal Corporation : अनधिकृतपणे झाडे तोडाल तर थेट जावे लागेल कोर्टात

नाशिक शहरात (Nashik Municipal Corporation)मोठ्या प्रमाणात अनधिकृत वृक्षतोड होत आहे. अनधिकृत वृक्षतोड केल्याचे आढळल्यानंतर संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केल्यानंतरही दंड भरला जात नाही. शहरात अवैध पद्धतीने होणारी वृक्षतोड रोखण्यासाठी वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात न्यायालयात खटले भरण्याचा निर्णय घेतला आहे.

हरित नाशिक सुंदर नाशिक’ ही ओळख जपण्यासाठी महापालिका उद्यान विभागाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु, आता महापालिकेचा दंड न भरल्यास थेट न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा आहे. शहरालगत असलेल्या गावांमध्ये आजही शेती केली जाते. पण असे असले तरी नागरिकरणामुळे वृक्षतोड झपाट्याने कमी होत आहे.

(हेही वाचा : Mumbai Nashik Highway : साकेत पुलावर अवजड वाहनांना फक्त रात्रीच एन्ट्री)

नव्या नियमानुसार, कोणत्याही वृक्षाची तोड करण्यापूर्वी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी बंधनकारक आहे. झाडांचे संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम कायदा, १९७५ व सुधारणा अधिनियम, २०२१ नुसार वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीशिवाय वृक्षांची तोड बेकायदेशीर ठरते. त्यामुळे अवैध वृक्षतोड केल्यास दंडासह पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. तसेच एक वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे. महापालिका क्षेत्रात कुठल्याही प्रकरणी वृक्षतोड वा वृक्षांची छाटणी करावयाची असल्यास उद्यान विभागामार्फत प्रस्ताव सादर करून त्यास आयुक्तांची परवानगी घेतली जाणे बंधनकारक आहे. परंतु, परवानगी न घेताच वृक्षतोड केली जात असल्याने आता आक्रमक पवित्रा घेत थेट न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.