Mumbai – Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर नवे संकट; चौपदरीच्या नवीन रस्त्याला तडे

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जरी डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई - गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले आहे.

62
मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai – Goa Highway)चौपदरीकरणावर दररोज नवनवीन समस्या येत आहेत. आता नवे संकट या महामार्गावर आल्याचे दिसत आहे. या महामार्गाचे ज्या ठिकाणी चौपदरीकरण झाले आहे, त्या सिमेंटच्या रस्त्याला तडे गेल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदारपणे करण्यात येत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते, तसेच वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदार कंपनीकडून अहवाल मागविला आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जरी डिसेंबर २०२३ पर्यंत मुंबई – गोवा महामार्गाचे (Mumbai – Goa Highway) काम पूर्ण होणार असल्याचे जाहीर केले असले तरी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणण्यानुसार हे काम मे २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. पळस्पे ते इंदापूरदरम्यान ८४ किलोमीटर लांबीचे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम २०११ मध्ये सुरू झाले. मात्र, १२ वर्षांचा कालावधी उलटूनही महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सद्य:स्थितीत महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. सुरुवातीला पळस्पे ते इंदापूर दरम्यान चौपदरीकरणाचे काम डांबरीकरणाच्या माध्यमातून करण्यात येत होते. मात्र, सध्या चौपदरीकरण काँक्रिटीकरणाच्या साहाय्याने केले जात आहे. या कामाचे पळस्पे ते कासू आणि कासू ते इंदापूर असे दोन भाग केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.