Mumbai Nashik Highway : साकेत पुलावर अवजड वाहनांना फक्त रात्रीच एन्ट्री

दिलेल्या वेळेनंतर संबंधित वाहन महामार्गावर आढळल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे निर्देश

95
साकेत पुलावर अवजड वाहनांना फक्त रात्रीच एन्ट्री
साकेत पुलावर अवजड वाहनांना फक्त रात्रीच एन्ट्री

मुंबई नाशिक महामार्गावर(Mumbai Nashik Highway) काहीच दिवसांपूर्वी साकेत पुलाच्या दुरुस्ती साठी हा पूल बंद करण्यात आला होता. मात्र वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने शहरातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत सक्त निर्देश जारी केले आहेत. अवजड वाहनांना विशिष्ठ वेळ नेमून दिली आहे. दिलेल्या वेळेनंतर ही वाहने शहरात आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी दिला आहे.

मुंबईच्या एंट्री पॉईंटवर दोन दिवसांपूर्वी अवजड वाहन बंद पडल्याने ठाण्यात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान, घोडबंदर, नाशिकवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत मुभा दिली असताना दिवसभर जड वाहनांची घुसखोरी शहरात सुरू असते. हीच बाब लक्षात घेता ठाणे वाहतूक शाखेने आता कंबर कसली आहे. दिलेल्या वेळेनंतर संबंधित वाहन महामार्गावर आढळल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे निर्देश ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले. पूर्व द्रुतगती महामार्गावर मुंबईत प्रवेश करताना टोलनाक्यावर नेमून दिलेल्या मार्गिकेचा वापर करण्याच्या सूचना अवजड वाहनांना देण्यात आल्याने हलक्या वाहनांचा मार्ग सुकर होणार आहे.

(हेही वाचा : China’s New Map : चीनच्या नवीन नकाशामुळे भारतासह अन्य देशही संतप्त; म्हणाले …)

आनंद जकात नका येथे स्वतंत्र मार्गिका
आनंद जकात नाका येथे अवजड वाहनांसाठी स्वतंत्र टोल मार्गिका देण्यात आली आहे. या मार्गिकांचाच वापर अवजड वाहनांनी करावा, असे निर्देश ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिले. अवजड वाहने पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या एंट्री पॉइंटवर असलेल्या टोल नाक्याच्या मार्गिकेत आल्यास हलक्या वाहनांची कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी राठोड यांनी सक्त सूचना दिल्या आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.