Leptospirosis : १४ वर्षांचा मुलगा लेप्टो, डेंग्यू, मलेरियाचा बळी

मुलाचा मलेरिया आणि डेंग्यूचा अहवालही पॉझिटिव्ह आला.

31
Leptospirosis : १४ वर्षांचा मुलगा लेप्टो, डेंग्यू, मलेरियाचा बळी
Leptospirosis : १४ वर्षांचा मुलगा लेप्टो, डेंग्यू, मलेरियाचा बळी

मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयात १४ वर्षांच्या मुलाचा लेप्टोस्पायरोसिसमुळे मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मुलाचा मलेरिया आणि डेंग्यूचा अहवालही पॉझिटिव्ह आला. मुंबईत आतापर्यंत लॅप्टोमुळे तीन संशयित मृत्यू असून, केवळ नायर रुग्णालयातील लेप्टोच्या मृत्यूबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

कुर्ल्यातील १४ वर्षांच्या मुलाला फुफ्फुसाचा गंभीर आजार झाला होता. गुंतागुंत वाढल्याने त्याला श्वसनालाही त्रास होऊ लागला. रुग्णाला उपचारासाठी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात आणण्यात आले. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली. तपासणी अहवालात रुग्णाला लेप्टोस्पायरोसीस सह डेंग्यू आणि मलेरियाचेही निदान झाले. रुग्णाला कावीळही झाली होती. रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. अवयव निकामी होत रुग्णाचा मृत्यू झाला.

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू लेप्टोस्पायरोसिसमुळे झाल्याचे सांगितले. याअगोदर केईएम रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात दोन रुग्णांचा लेप्टोस्पायरोसिसमुळे संशयित मृत्यू झाला आहे. केईएम रुग्णालयात महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २१ वर्षांचा युवक उपचारासाठी दाखल झाला. तपासाअंती त्याचे लॅप्टोचे निदान झाले. १८ ऑगस्ट रोजी एका ज्येष्ठ नागरिकाला अत्यावस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाला खासगी रुग्णालयातून रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले होते. या रुग्णाचाही लेप्टोस्पायरोसिसमुळे मृत्यू झाला. दोन्ही मृत्यूबाबत केईएम प्रशासन आणि पालिका आरोग्य विभागाने कोणतीच अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.

मुंबईत साचलेल्या पाण्याच्या नजीकच्या रस्त्यांवरील खाद्यपदार्थ खाऊन पोटाची बाधा झालेले रुग्ण वाढत असल्याचेही निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. अँटीबायोटिक्सचा पूर्ण कोर्स करूनही काही रुग्णांना पटकन आराम मिळत नसल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. सांधेदुखीकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. सांधेदुखी डेंग्यूचे लक्षण असू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. मलेरियाच्या तुलनेत डेंग्यू जास्त घातक आजार मानला जातो, त्यामुळे डेंग्यूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

(हेही वाचा – China’s New Map : चीनच्या नवीन नकाशामुळे भारतासह अन्य देशही संतप्त; म्हणाले …)

काय काळजी घ्याल –
  • रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ खाऊ नका.
  • साचलेल्या पाण्याजवळच्या नागरी वसाहतीतील माणसांनी आरोग्याची आवश्यक काळजी घ्या.
  • रस्त्यावर साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नका. पावसात घराबाहेर पडण्यापूर्वी पायाला जखम असल्यास बाहेर जाणे टाळा किंवा मलमपट्टी लावून बाहेर पडा.
  • घराबाहेर छप्परावर साचलेले पाणी स्वच्छ करा.
  • घरातील भांडी तसेच झाडाच्या कुंड्यांमध्ये साचलेले पाणी सतत बदलत रहा.
  • पाणी उकळून प्या.
  • तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस पोटदुखी असल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.