HSRP Number Plate ला तिसऱ्यांदा मुदतवाढ; वाहनधाकरांसाठी ‘ही’ शेवटची संधी

227
जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसवण्यासाठी धावपळ करणाऱ्या वाहनधारकांना राज्य सरकारने आता तिसरी मुदतवाढ दिली आहे. १ एप्रिल, २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवण्याची प्रक्रिया १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करता येणार आहे. ही शेवटची संधी असून, यानंतर ‘एचएसआरपी’ नसलेल्या जुन्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. (HSRP Number Plate)

(हेही वाचा – Monsoon Updates : कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा! मुंबईसह रायगड, रत्नागिरी, घाट परिसराला ऑरेंज अलर्ट)

राज्यात सुमारे दोन कोटी जुनी वाहने आहेत. सद्यस्थितीत २३ लाख जुन्या वाहनांना ‘HSRP’ बसवण्यात आले आहेत. ४० लाख वाहनधारकांनी ‘एचएसआरपी’ साठीची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली आहे. जवळपास सव्वा कोटी वाहने अद्याप ‘एचएसआरपी’ च्या कक्षेबाहेर आहेत.

यापूर्वीची मुदतवाढ
३० एप्रिल, २०२५
३० जून, २०२५

(हेही वाचा – Karnataka Congress Government चे मुस्लिम लांगुलचालन; मुसलमानांचे आरक्षण आणखी वाढवणार)

अनेक फिटमेंट केंद्रे बंद
एप्रिल २०१९नंतर नोंदणी होणाऱ्या नव्या वाहनांना डीलरकडून ‘एचएसआरपी’ बसवण्यात येत आहेत. अर्ज करूनही जुन्या वाहनधारकांना संबंधित कंपन्यांकडून ‘एचएसआरपी’ मिळत नसल्याचे वास्तव आहे. ‘एचएसआरपी’ तयार करणाऱ्यांकडून विलंब होत असल्याने कंपन्यांकडे धीम्या गतीने पुरवठा होत आहे. अनेक फिटमेंट केंद्रे बंद झाली आहेत. यावर उपाय करून तातडीने ‘एचएसआरपी’ उपलब्ध होतील, यासाठी राज्य सरकारने वाहनचालकांना मुदतवाढ देताना संबंधित कंपन्यांना मोठ्या प्रमाणात ‘एचएसआरपी’ तयार करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे, असे राज्य वाहनचालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.
‘या’ तीन कंपन्यांची निवड
राज्यातील ६० परिवहन प्रादेशिक-उपप्रादेशिक कार्यालयांची तीन मंडळांत विभागणी केली आहे. तीन मंडळांसाठी मेसर्स रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, मेसर्स रियल मेजॉन इंडिया लिमिटेड, मेसर्स एफ टी ए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Air India Plane Crash : एअर इंडिया मोठ्या विमानांचा वापर १५ टक्क्यांनी कमी करणार)

ही शेवटची संधी असून – परिवहनमंत्री
राज्यातील जुन्या वाहनधारकांना ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट बसवण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. जुन्या वाहनधारकांनी ‘एचएसआरपी’ बसवली नसल्यास तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी. ही शेवटची मुदतवाढ असेल. त्यानंतर जुन्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. असे विधान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.