Hindus In Bangladesh : बांगलादेशातील मुसलमानांच्या छळाला कंटाळून १०० हिंदूंनी घेतला भारतात आश्रय

106
Hindus In Bangladesh : बांगलादेशातील मुसलमानांच्या छळाला कंटाळून १०० हिंदूंनी घेतला भारतात आश्रय
Hindus In Bangladesh : बांगलादेशातील मुसलमानांच्या छळाला कंटाळून १०० हिंदूंनी घेतला भारतात आश्रय

बांगलादेशातून बंगालमध्ये पळून आलेल्या एका निर्वासिताने तेथील वेदनादायी परिस्थिती सांगितली आहे. त्याने सांगितले की, स्वतःच्या सुरक्षेसाठी बांगलादेशातील २५ हिंदु कुटुंबांतील १०० लोकांना पलायन करून बंगालमध्ये आश्रय घेण्यास भाग पडले आहे. बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्‍या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली जगावे लागत आहे. (Hindus In Bangladesh)

(हेही वाचा – WPL 2024 : दीप्ती शर्माच्या हॅट-ट्रीकसह अष्टपैलू खेळामुळे युपी वॉरियर्सची दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेनं मात)

मतदानानंतरचा हिंसाचाराने घेतला निर्णय

या निर्वासित हिंदूने सांगितले की, बांगलादेशात निवडणूकपूर्व आणि मतदानानंतरचा हिंसाचार, यांमुळे बांगलादेशातील उजिरपूर येथील हिंदूंमध्ये इतकी भीती निर्माण झाली की, ७ जानेवारी २०२४ पासून २५ हिंदु कुटुंबांनी वेळ न दवडता तेथून पलायन करून बंगालमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि अखेर मार्चमध्ये ते बंगालमध्ये पोचले.

बांगलादेशात निवडणुका आल्या की, अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचार आणखी वाढतात. निवडणुकीपूर्वी धर्मांध मुसलमान हिंदूंना लक्ष्य करतात. बांगलादेशमध्ये यावर्षी ७ जानेवारीला संसदेच्या निवडणुका झाल्या. या काळात हिंदूंना जाळपोळ आणि आक्रमणे, यांमुळे घर सोडून पळून जावे लागले. या हिंसक घटनांमध्ये ‘अवामी लीग’ पक्षाशी संबंधित धर्मांधांनी इतर पक्षांना किंवा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार्‍या हिंदूंच्या घरांवर आक्रमणे केली. (Hindus In Bangladesh)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.