चक्रीवादळादरम्यान नुकसान झाल्यास संपर्क कुठे कराल? ‘हे’ आहेत संपर्क क्रमांक

मत्स्य व्यवसाय विभागाकडून अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

94

सध्या तोक्ते चक्रीवादळ हे अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे या वादळापासून अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांचे व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. महाराष्ट्रात तोक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर मासे, कासव आदी जलचर प्राणी वाहून आल्याचे आढळल्यास किंवा बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचे नुकसान झाल्यास संपर्क साधण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

इथे करा संपर्क

मुंबई शहर

वरळी / ससून गोदी : कु. पाटील (७९७२२६३९४) नवीन भाऊचा धक्का: श्री. बादावार (९४२२८७२८५६)

ठाणे/पालघर

ठाणे: श्री. पाटील (९९२३०५०९८३)
डहाणू : कु. भोय(८६००६२७९०८)
सातपाटी: श्री. बाविस्कर (८४४६३२५०४०)
वसई : श्री. कोरे (९८२३०४११८९)
एडवण: श्री. अलगिरी (९८२३२१२७२२)

रत्नागिरी

जयगड : सौ.कांबळे (८३६९०८५०४९)
मिरकरवाडा : श्री. पाथरे (९५९४७४८७३८) साखारीनाटे : श्री. महाडवाला (९४०५९१०५०३)
गुहाघर: श्री. देसाई (९४०५०८५६१५)
दाभोळ : सौ.साळवी (८२७५४३५७०३)

मुंबई उपनगर

माहुल तुर्भे : श्री. साबळे (८२०८९०६९०२)
वर्सोवा : श्री. बुंदेले (९८३३९११९०५)
मढ गोराई : श्री. जावळे (९८३३२६६२५१)

रायगड

उरण : श्री. दाभणे(७०२१५४२११२)
अलिबाग: श्री. अंबुलकर (८०८०९९२२०३)
मुरुड : श्री. वाळुंज (७७९८७१६७२७)
श्रीवर्धन : श्री. पाटील (९८८१४५२४३६)

सिंधुदुर्ग

देवगड : श्री.मालवणकर (९४२२२१६२२०)
वेंगुर्ला : श्री. जोशी (९४२१२३८९१३)
मालवण : श्री. भालेकर (९८२३५७९३८२)

(हेही वाचाः चक्रीवादळामुळे मुंबईतील ५८० कोरोनाग्रस्त रुग्णांचे रात्रीच स्थलांतर!)

तसेच या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून मच्छीमार बांधवांना काही सूचना देखील करण्यात आल्या आहेत. आपल्या मासेमारी नौका आणि इतर साहित्ये सुरक्षित ठेवावीत, तसेच नौका मालकांनी आपल्या खलाशांची सुरक्षित ठिकाणी सोय करावी, असे सांगण्यात आले आहे. चक्रीवादळाने जोरदार पावसाला राजापूर तालुक्यात सुरुवात झाली. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कच्च्या घरात राहणाऱ्या तालुक्यातील 652 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या 512 नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहचल्या आहेत.

(हेही वाचाः रविवारी वाऱ्याचा वेग ताशी ६० ते ८० किलोमीटर!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.