पावसाची संततधार : विक्रोळीमध्ये घरावर कोसळला डोंगराचा भाग; तर मालाड येथे झाड पडून एकाचा मृत्यू

सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबई, ठाण्यातील अनेक भागात पाणी साचले आहे.

217
पावसाची संततधार : विक्रोळीमध्ये घरावर कोसळला डोंगराचा भाग; तर मालाड येथे झाड पडून एकाचा मृत्यू

मुंबई आणि ठाण्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबई, ठाण्यातील अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे काही भागात वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. तर मुंबईकरांना पाण्यातूनच वाट काढून चालावे लागत आहे. अशातच मुंबईत झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर विक्रोळी सुर्यनगर परिसरात डोंगराचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

विक्रोळीमध्ये डोंगराचा काही भाग कोसळला

विक्रोळी येथील सुर्यनगर परिसरात एकाच दिवशी भिंत खचणे आणि डोंगराचा काही भाग कोसळणे अशा दोन घटना घडल्या आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे पहिला संरक्षक भिंत कोसळली आणि त्यानंतर त्याच परिसरात डोंगराचा काही भाग कोसळला आहे. डोंगराचा काही भाग हा एका घरावर कोसळला असून यामध्ये अडकलेल्या नागरिकांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या व स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

(हेही वाचा – Mumbai Metro : मुंबई मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या पोहोचली २ लाखांवर)

झाड पडल्याने ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

आज म्हणजेच बुधवार २८ जून रोजी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कौशल महेंद्र जोशी (वय वर्ष ३३) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे ३५ फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. पहाटे कौशल दोषी, चाळीतील शौचालयात गेला असता हे झाड कोसळले. झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळे कौशल यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.