Heavy Rain : मुंबईत आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार

विदर्भाच्या काही भागातही पावसाचा यलो अलर्ट जारी

172
Heavy Rain : मुंबईत आज दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर (Heavy Rain) वाढला आहे. अशातच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजेच सोमवार १७ जुलै रोजी मुंबईत दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार आहे.

आज पहाटेपासूनच मुंबईसह ठाणे, पालघर येथे मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली असून याचा वाहतुकीवर परिमाण होतांना दिसत आहे. रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतूक देखील धीम्या गतीने सुरु आहे.

(हेही वाचा – Legislature Monsoon Session 2023 : सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आक्रमक होणार; विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात)

मुंबईसह देशात देखील मुसळधार

हवामान विभागाच्या माहितीनुसार, या आठवड्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळणार असून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, उत्तर ओडिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंड दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. यामुळे पुढील पाच दिवस मध्य आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यातही पुढील पाच दिवस जोरदार पाऊस

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भाच्या काही भागातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.