GST Collections : अर्थमंत्रालयाने अर्थसंकल्पच्या पूर्वसंध्येला दिली जीएसटीबाबत गुड न्यूज

अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच अर्थमंत्र्यांनी 'आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा ४ वास्तविक जातींवर लक्ष केंद्रित केले. तसेच त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास या गोष्टी आमच्या प्राधान्याक्रमावर आहेत', असे सांगत अर्थसंकल्पाची दिशा स्पष्ट केली.

279
GST Collections : अर्थमंत्रालयाने अर्थसंकल्पच्या पूर्वसंध्येला दिली जीएसटीबाबत गुड न्यूज

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास बुधवार, ३१ जानेवारी पासून सुरुवात झाली असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज म्हणजेच गुरुवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा अर्थसंकल्प लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी सादर होत असल्याने सरकारला तो पूर्ण स्वरूपात मांडता आला नाही. (GST Collections)

(हेही वाचा – Budget 2024 : यंदाचा अर्थसंकल्प गरीब, महिला, युवा आणि अन्नदात्यांसाठी; काय म्हणाल्या अर्थमंत्री)

अर्थसंकल्पाच्या (GST Collections) सुरुवातीलाच अर्थमंत्र्यांनी ‘आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा ४ वास्तविक जातींवर लक्ष केंद्रित केले. तसेच त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास या गोष्टी आमच्या प्राधान्याक्रमावर आहेत’, असे सांगत अर्थसंकल्पाची दिशा स्पष्ट केली.

एकीकडे सरकारच्या अंतरिम बजेटची चर्चा सुरु असताना दुसरीकडे या अर्थसंकल्पच्या पूर्वसंध्येला जीएसटीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्थमंत्रालयाने (GST Collections) बुधवारी (३१ जानेवारी) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२४ वस्तु व सेवा कर (GST) संकलनात १०.४ टक्क्यांनी वाढ होऊन १.७२ कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक मासिक संकलन असल्याचे अर्थमंत्रालयाने सांगितले आहे.

(हेही वाचा – Gyanwapi Case : 6 डिसेंबरची पुनरावृत्ती होऊ शकते; असदुद्दीन ओवैसी यांना ज्ञानवापीतील पूजेमुळे पोटशूळ)

अधिक माहितीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये महिनाअखेर संध्याकाळी ५ पर्यंत एकत्रीत (GST Collections) जीएसटी संकलन १.७२,१२९ कोटी रुपये झाले आहे. तर मागील वर्षाच्या जानेवारीत महिनाअखेर संध्याकाळी १.५५,९२२ कोटी झाले होते. म्हणजेच या महिन्यात मागील वर्षांच्या तुलनेत १०.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एप्रिल २०२३ मध्ये आत्तापर्यंतचा सर्वाधिक मासिक जीएसटी संकलन म्हणजेच १.८७ लाख कोटी नोंदवण्यात आले होते.

(हेही वाचा – LPG Cylinder Price : अर्थसंकल्पाच्या आधी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ)

अर्थसंकल्प मांडतांना अर्थमंत्र्यांनी केलेल्या काही आकर्षक घोषणा –

१. देशाच्या भांडवली खर्चासाठी नवीन आर्थिक वर्षासाठी ११.१ लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात ११.१ टक्क्यांची
वाढ झाली आहे.

२. नवीन टेक-सॅव्ही उद्योजकतेनं भारलेल्या तरुणांसाठी नवीन अर्थसहाय्य योजना. त्यासाठी १ लाख कोटी रुपयांची तरतूद. या निधीतून तरुणांना कमी
व्याजदराने किंवा काही वेळा व्याजरहित कर्ज उपलब्ध करून देणार.

३. आयुष्मान भारत (Ayushman Bharat) योजनेचा फायदा आता अंगणवाडी आणि आशासेविकांनाही मिळणार.

४. गरोदर माता आणि नवजात अर्भकासाठी असलेल्या कल्याण योजनेला अधिक सर्वसमावेशक करणार. त्यासाठी नवीन योजना आणणार.

५. ‘लखपती दीदी’ योजनेचं उद्दिष्टं २ कोटी रुपयांवरून ३ कोटी रुपयांवर आणलं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.