Ind vs Eng 2nd Test : दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात समावेशासाठी सर्फराझ आणि रजत पाटिदार यांच्यात टक्कर

Ind vs Eng 2nd Test : दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात समावेशासाठी सर्फराझ आणि रजत पाटिदार यांच्यात टक्कर

161
Ind vs Eng 2nd Test : दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात समावेशासाठी सर्फराझ आणि रजत पाटिदार यांच्यात टक्कर
Ind vs Eng 2nd Test : दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात समावेशासाठी सर्फराझ आणि रजत पाटिदार यांच्यात टक्कर

ऋजुता लुकतुके

विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटीत मधल्या फळीत कुणाला स्थान द्यायचं, सर्फराझ खानला (Sarfaraz Khan) की रजत पाटिदार (Rajat Patidar) या प्रश्नाचं उत्तर कसोटीपूर्वी दोन दिवस आधी फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathour) यांच्याकडेही नव्हतं. किंवा त्यांनी ते स्पष्टपणे दिलं नाही. भारतासाठी ही कसोटी महत्त्वाची आहे. कारण, ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघासमोर घरच्या मालिकेत पुनरागमन करण्याचं आव्हान आहे. आणि त्यातच के एल राहुल (KL Rahul) आणि रवींद्र जाडेजा जायबंदी झाल्यामुळे नवखे खेळाडू घेऊन भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. (Ind vs Eng 2nd Test)

(हेही वाचा – Budget 2024 : यंदाचा अर्थसंकल्प गरीब, महिला, युवा आणि अन्नदात्यांसाठी; काय म्हणाल्या अर्थमंत्री)

विशाखापट्टणमची खेळपट्टी फिरकीला साथ देईल

या दोघांऐवजी निवड समितीने सर्फराझ खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश केला आहे. तर विराटच्या अनुपस्थितीत रजत पाटिदारची निवड या आधीच झाली होती. आता यातील सर्फराझ आणि रजत यांच्यात के एल राहुलची जागा घेण्यासाठी चुरस आहे.

‘रजत आणि सर्फराझ यांच्यातून एकाची निवड करणं कठीण आहे. दोघांमुळे संघाला वेगवेगळी ताकद मिळते. खेळपट्टीचं स्वरुप बघूनच यातून एकाची निवड करावी लागेल. विशाखापट्टणमची खेळपट्टी फिरकीला साथ देईल, हे नक्की. पण, कदाचित पहिल्या दिवसापासून ती वळणार नाही. कोणाची निवड करायची हे शेवटी रोहीत शर्मा आणि राहुल द्रविड ठरवतील,’ असं विक्रम राठोड पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर पडला असला, तरी मालिकेत पुनरागमन करण्यापेक्षा खेळाडूंनी मागील कसोटीतील चुका टाळण्यावर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी खेळाडूंना दिला आहे. तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना खेळाडूला कोचिंगची फारशी गरज नसते असंही त्यांनी बोलून दाखवलं.

(हेही वाचा – Gyanwapi Case : 6 डिसेंबरची पुनरावृत्ती होऊ शकते; असदुद्दीन ओवैसी यांना ज्ञानवापीतील पूजेमुळे पोटशूळ)

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू पोहोचला की, त्याला फटके कसे खेळायचे हे शिकवावं लागत नाही. बदलत्या परिस्थितीत कसं खेळायचं याचं मार्गदर्शन लागतं. खेळाडू शिकलेले असतात. फक्त चांगली कामगिरी त्यांच्याकडून घडावी यासाठी त्यांना मदत लागते. प्रत्येक देश आणि गाव इथं क्रिकेटचं वातावरण वेगळं असतं, त्याच्याशी जुळवून घेत फलंदाजी कशी करायची याचं मार्गदर्शन लागतं,’ असं शेवटी विक्रम राठोड यांनी बोलून दाखवलं.

भारतीय फलंदाजांचा फॉर्म हरवला आहे हा आरोप त्यांनी अमान्य केला. तसं असतं देशात आणि परदेशातही भारताने कसोटी जिंकल्या नसता असा उलट दावा त्यांनी केला. (Ind vs Eng 2nd Test)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.