Mumbai Dahihandi : गोविंदांच्या आनंदावर असे पडले विरजण

सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने या उंच हंड्या पाहण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना आणि पर्यटकांना घरातच अडकवून ठेवले.

41
Mumbai Dahihandi : गोविंदांच्या आनंदावर असे पडले विरजण
Mumbai Dahihandi : गोविंदांच्या आनंदावर असे पडले विरजण

मच गया शोर सारी नगरी रे…च्या गाण्यावर उंचच उंच हंड्या फोडणाऱ्या गोविदांचा उत्साह हा या हंड्या पाहण्यासाठी येणाऱ्या दर्शकांमुळे वाढत असतो. लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे गोविंदाचा उत्साह अधिक वाढला जातो आणि थरावर थर चढवत शेवटच्या थरावरील गोविंदा लिलया हंडी फोडून सर्वांच्या डोळ्यांच पारणे फेडत असतो. परंतु, गुरुवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे एरव्ही आपल्या बालबच्च्यासह हंडी पहायला येणाऱ्या दर्शकांची तथा पर्यटकांची गर्दी नसल्याने गोविंदांच्या आनंदावरच एकप्रकारे विरजण पडल्याचे पहायला मिळत होते.

बोल बजरंग बली की जय… तीन बत्तीवाला गोविंदा आला अशाप्रकारे शोर करत गुरुवारी (०९ सप्टेंबर) मुंबईल अनेक रस्त्यांवर गोविंदांची पथके दहिहंडींचा शोध घेत फिरत होती. परंतु सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने या उंच हंड्या पाहण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना आणि पर्यटकांना घरातच अडकवून ठेवले. पावसामुळे अनेक पर्यटक आणि मुंबईकर हे घराबाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे हजारो, लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली असली तरी प्रत्यक्षात या त्यांच्या साहसाचे कौतुक करायला आणि त्यांना पाठिंबा देणारे दर्शकच अनेक ठिकाणी नसल्याने गोविंदा पथकांमध्ये आनंद दिसून येत नव्हता.

गोविंदांच्या म्हणण्यानुसार, मुळात आम्ही जेव्हा सराव करतो तेव्हा आम्ही नियोजन बध्द असेच थरच रचत असतो. त्यामुळे किती थर रचू शकतो याची आम्हाला कल्पना असते. आमच्या जवानांना या थराची कल्पना असतेच. पण आमचा उत्साह आणि आनंद हा उपस्थितांच्या गर्दीवर वाढत असतो. जमलेली गर्दी हेच आमचा उत्साह वाढवणारी असते, परंतु यंदा पावसामुळे लोकच हंडी पाहण्यासाठी बाहेर पडली नाही. त्यामुळे आम्ही हंडी फोडली पण पाहणारे आणि आमच्या पथकाला पाठिंबा देणारे दर्शकच नसल्याने आमचाही आनंद कमी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता सोशल मीडियाच्या माध्यमाचा वापर अधिक होत असल्याने लोक आता प्रत्यक्षात येऊन पाहण्यासाठी यूट्यूब किंवा फेसबूकवर किंवा चॅनेलवर लाईव्ह पहायला लागले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कमी होणाऱ्या या गर्दीला यंदा पावसाचीही जोड मिळाल्याने आमचे कौतुक करायला प्रत्यक्षात लोक नसल्याने निश्चितच गोविंदांच्या आनंदावर या पावसाने विरजण पाडल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – kidnapping News : साडेपाच वर्षाच्या मुलीच्या अपहरणा प्रकरणी एकाला अटक, मुलीची सुखरूप सुटका)

कृत्रिम पावसाचा केलेल्या प्रयोगाचा खर्चही गेला वाया

एरव्ही दहिहंडी फोडताना रचणाऱ्या गोविंदा पथकांवर एरव्ही पाऊस नसल्यास कृत्रिम पाऊस पाउला जातो. टँकरद्वारे पाण्याचे तुषार उडवून गोविंदांना भिजवण्याचा प्रकार होत असतात. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कडक उन्हामुळे तापलेल्या वातावरणामुळे अनेक ठिकाणी टँकर तैनात करून त्याद्वारे गोविंदावर पाणी मारण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला होता. त्यासाठी अनेक ठिकाणी आयोजकांनी पाण्याचे टँकरही सकाळपासून हंडीच्या ठिकाणी तैनात ठेवले होते. परंतु सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने या कृत्रिम पावसाच्या तयारीसाठी केलेला पैसाच वाया गेल्याचे पहायला मिळाले. दादरमध्ये रानडे मार्गावरील भाजपच्यावतीने आयोजित केलेल्या आणि नक्षत्र मॉलच्याठिकाणी शिवसेना उबाठा गटाच्यावतीने आयोजित केलेल्या दहिहंडीच्या ठिकाणी पाण्याचे टँकरची व्यवस्था केली होती. परंतु पाऊस असल्याने या टँकरच्या पाण्याचा वापरही करण्यात आला नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.