सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! MPSC अंतर्गत भरती; अर्ज करण्यासाठी शेवटचा १ दिवस शिल्लक

78

महाराष्ट्र लोकसेवा आयोगअंतर्गत तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी) पदांच्या एकूण १६९५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०२२ आहे.

( हेही वाचा : BEST@75 : बेस्टची पंचाहत्तरी; 7 ऑगस्टला साजरा होणार ‘अमृतमहोत्सवी बेस्ट दिन’)

नियम व अटी

  • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा परीक्षा 2021.
  • पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक आणि लिपिक – टंकलेखक (इंग्रजी/मराठी).
  • पद संख्या – 1695 जागा.
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र.
  • अर्ज शुल्क –
    अमागास – रु. 719/-
    मागासवर्गीय- रु. 449/-
    माजी सैनिक – रु.44/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज भरणे सुरु झाल्याची तारीख – 30 जून 2022
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022
  • अधिकृत वेबसाइट – mpsc.gov.in
  1. हे अर्ज केवळ आयोगाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारले जातील.
  2. अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in/candidate संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. परीक्षा शुल्क भल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.