Salman Khanच्या हत्येसाठी ७० मुलांची टोळी; परदेशात बसलेल्या लेडी डॉनची बिष्णोई टोळीला मदत

138

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या हत्येसाठी लॉरेन्स बिष्णोई टोळीने ७० जणांना तयार केले आहे, हे ७० जण मुंबई, पुणे,  नवी मुंबई, रायगड, ठाणे, गुजरात येथे वास्तव्यास होते. सलमान खानच्या हत्येसाठी बिष्णोई टोळीला लेडी डॉन चिनू ही परदेशातून मदत करीत असल्याची धक्कादायक बाब नवी मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ७० जणांचे वेगवेगळे मॉड्युल तयार करण्यात आले असून त्यापैकी मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी दोन मॉड्युल उदध्वस्त केले असले तरी सलमान खानच्या जिवाचा धोका संपलेला नाही. या दोन्ही घटनांनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे.

अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) हत्येचा कट रचल्या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या दुसऱ्या गटातील चौघांना अटक केली आहे. या गटाने सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसची रेकी केली होती व सलमान खानच्या मागावर होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने यापूर्वी सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानावर गोळीबार केल्या प्रकरणी बिष्णोई टोळीच्या एका गटाला अटक केली होती, त्यात गोळीबार करणाऱ्या शूटर्सचा समावेश होता. सलमान खानच्या हत्येचा बिष्णोई टोळीकडून दुसऱ्यांदा रचण्यात आलेला कट नवी मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. धनंजय तपसिंग उर्फ अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ न्हवी, वाप्सी खान उर्फ वसीम चिकना आणि रिजवान खान आणि रविवारी दीपक हवासिंग गोगलीया उर्फ जॉनी वाल्मिकी (३०) याला हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे.

सलमानच्या हत्येसाठी ७० मुलाचे वेगवेगळे मॉड्युल….

नवी मुंबई पोलिसांच्या तपासात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे, लॉरेन्स बिष्णोई आणि संपत नेहरा यांनी सलमानच्या हत्येसाठी ६० ते ७० मुलांना तयार करून त्यांचे वेगवेगळे मॉड्युल तयार केले होते. या मुलांमध्ये १५ ते १७ वयोगटातील मुलांचा समावेश असून एक मॉड्युल अपयशी ठरले तर ते काम दुसरे मॉड्युल करतील, अशी योजना लॉरेन्स बिष्णोई व गोल्डी ब्रार टोळीने आखली होती. अटक करण्यात आलेल्यापैकी अजय कश्यप हा पाकिस्तानस्थित डोगर नावाच्या व्यक्ती सोबत व्हिडीओ कॉल‌द्वारे संपर्कात होता, डोगर आणि त्याचे दोन साथीदारांनी त्यावेळी व्हिडिओ कॉलवर कश्यपला अत्याधुनिक शस्त्रे दाखवली होती.

(हेही वाचा Lok Sabha Exit Poll : ‘एक्झिट पोल’नंतर काँग्रेस, शिवसेना उबाठा राजकीय ‘अत्यवस्थ’)

पाकिस्तानमधून सलमानच्या हत्येसाठी शस्त्र खरेदी….

नवीमुंबई  पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे, सलमान खानच्या हत्येसाठी एके- ४७,, एम-१६ एके-९२ आणि पंजाबी गायक सिद्ध मुसेवालाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले अत्याधुनिक जिगाना हे शस्त्र उपलब्ध होतील असे अजय कश्यप, संदिप बिष्णोई उर्फ गौरव भाटीया सुखा शुटर, वसीम चीना तसेच बिष्णोई टोळीतील सदस्यांमध्ये झालेल्या संभाषणामध्ये समोर आले आहे.हे शस्त्र पाकिस्तान स्थित डोगर हा कच्छ मार्गे हे शस्त्र अटकेत असलेला अजय कश्यप पर्यत येणार होते. या कामासाठी शस्त्रे ज्यावेळेस प्राप्त होतील त्यावेळेस अजय कश्यप व त्याचे इतर साथीदार सिनेअभिनेते सलमान खान यांना धडा शिकवणार असल्याचे व्हिडीओ कॉलद्वारे स्पष्ट झाले असून या कामाचे पैसे गोल्डी ब्रार मार्फत कॅनडा येथून मिळणार असल्याचे व्हिडीओ कॉल‌द्वारे माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

परदेशात बसलेली लेडी डॉनची बिष्णोई टोळीला मदत…

पनवेल पोलिसांनी अटक केलेल्या अजय कश्यपच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली,  तो मागील एका वर्षापासून काश्मीर गंगानगर, पाकिस्तान बॉर्डर, बिहार, सीवान, गोरखपूर नेपाळ बॉर्डर, तिरुनावल्ली व तामीळनाडू ठिकाणी वावरत होता, ही  ठिकाणे हे अवैधरित्या शस्त्र तस्करीचे ठिकाणे असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. अजय कश्यप याने पनवेल मधील सलमान खान यांचे असलेले फार्म हाऊस, बांद्रा येथील घर तसेच फिल्मसिटी येथे रेकी केली असलेबाबत माहिती समोर आली, अजय कश्यपच्या संपर्कात चिनू नावाची लेडी डॉन आहे, ही लेडी डॉन आखाती देशात बसून आपली टोळी चालवत असून ती बिष्णोई टोळीला या कामासाठी मदत करीत असल्याचे समोर आले. चिनू ही आनंद पाल या गँगस्टरची मुलगी असून तो पोलीस चकमकीत मारला गेल्यानंतर  आनंद पाल याची टोळी त्याची मुलगी चिनू चालवत आहे. चिनूची संघटना आणि बिष्णोई संघटना या एकमेकांना सहकार्य करीत असल्याचे समजते.

सलमान खानवर हल्ल्यानंतर….

सलमान खानवरील (Salman Khan) हल्ला यशस्वी झाल्यानंतर पनवेल पोलिसांनी अटक केलेले आरोपी भूमिगत होणार होते आणि कन्याकुमारीमध्ये पुन्हा एकत्र येणार होते तेथून ते श्रीलंकेला जाणार होते, अशी माहिती अटक आरोपीच्या तपासात समोर आल्याची माहिती नवीमुंबई पोलिसांनी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की अटक आरोपीचा सलमान खान यांच्या  वांद्रे येथील गॅलक्सि आपर्टमेंटवर झालेल्या हल्ल्याशी काही संबंध आहे का हे तपासण्यात येत आहे.वांद्रे हल्ला प्रकरणातील सहा आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.