पुलवामा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत Lashkar-e-Taiba च्या आतंकवाद्याचा खात्मा

चकमकीदरम्यान दहशतवादी लपून बसलेल्या घराला आग लागली. परंतु, सुरक्षा दलांनी आपला मोर्चा आणि गोळीबार कायम ठेवला यात रियाज अहमद डार (Riaz Ahmad Dar) हा Lashkar-e-Taiba चा कमांडर ठार झाला.

162
पुलवामा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत Lashkar-e-Taiba च्या आतंकवाद्याचा खात्मा
पुलवामा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत Lashkar-e-Taiba च्या आतंकवाद्याचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सोमवार, ३ जून रोजी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील निहामा परिसरात झालेल्या या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचा (Lashkar-e-Taiba) टॉप कमांडर रियाज अहमद डार उर्फ पीर बाबा उर्फ खालिद ठार झाला. त्याच्यासोबत एका घरात लपून बसलेला दहशतवादी देखील मृत्यूमुखी पडलाय. रियाज डार हा डबल प्लस-प्लस-ए कॅटेगिरीतील टॉपचा दहशतवादी कमांडर होता.

(हेही वाचा – Lok Sabha Elections Exit Poll : महाविकास आघाडीत सर्वाधिक नुकसान ‘शिवसेना उबाठा’चे, काँग्रेस फायद्यात)

रियाज अहमद डार ठार

यासंदर्भातील माहितीनुसार पुलवामा जिल्ह्यातील निहामा भागातल्या एका घरात 2 दहशतवादी लपून बसले होते. याबाबत माहिती मिळताच सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला. या वेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर दोन्ही बाजुंनी झालेल्या गोळीबारात हे दहशतवादी ठार झाले. चकमकीदरम्यान दहशतवादी लपून बसलेल्या घराला आग लागली. परंतु, सुरक्षा दलांनी आपला मोर्चा आणि गोळीबार कायम ठेवला यात रियाज अहमद डार (Riaz Ahmad Dar) हा लश्कर-ए-तोयबाचा कमांडर ठार झाला.

विशेष एनआयए न्यायालयाकडून फरार घोषित

गेल्या 9 वर्षांपासून ते सक्रीय काश्मीर खोऱ्यात सक्रीय होता. रियाज अहमद हा अनेक वर्षांपासून सुरक्षा दलांना हवा होता. त्याच्यावर खुनाचे अनेक आरोप होते. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील विशेष एनआयए न्यायालयाने रियाज अहमद डार उर्फ पीर बाबा उर्फ खालिद याला फरार घोषित केले होते. डबल प्लस ए श्रेणीतील दहशतवादी रियाझवर सुरक्षा यंत्रणांनी 15 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळे रियाज डारचा चकमकीत खात्मा होणे हा सुरक्षा दलासाठी मोठा विजय मानला जातोय. (Lashkar-e-Taiba)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.