Lok Sabha Exit Poll : ‘एक्झिट पोल’नंतर काँग्रेस, शिवसेना उबाठा राजकीय ‘अत्यवस्थ’

197
Exit Poll : ‘एक्झिट पोल’ तोंडघशी का पडले?

लोकसभा २०२४ निवडणुकीच्या ‘एक्झिट पोल’नंतर काँग्रेस, शिवसेना उबाठा हे राजकीय पक्ष अस्वस्थ नाहीत तर राजकीय ‘अत्यवस्थ’ झाल्याचे दिसून येत आहे. या एक्झिट पोलनंतर काही नेत्यांनी नैराश्येतून असंबंध वक्तव्ये सुरू केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Lok Sabha Exit Poll)

८००-९०० जागा मिळायला हव्यात

शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी एक्झिट पोलचे निष्कर्ष विरोधात गेल्याने संताप व्यक्त करत एक्झिट पोलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हे ‘एक्झिट पोल’ म्हणजे ‘फ्रॉड’ आहे, असा आरोप केला. तसेच भाजपा ठरवून दिलेले आकडे आहत आणि भाजपा एक्झिट पोल यंत्रणेवर दबाव टाकते, असे म्हणत भाजपाला ८००-९०० जागा मिळायला हव्यात, असे हास्यास्पद मत व्यक्त केले. मोदी यांनी कन्याकुमारी येथे जाऊन ध्यान केले आणि अशा ध्यानस्थ माणसाला ७००-८०० जागा मिळाल्या पाहिजे, असा टोमनाही मारला. (Lok Sabha Exit Poll)

(हेही वाचा – BJP च्या माजी मंत्र्यांनीच केली कथोऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी)

‘फॅंटसी पोल’

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही एक्झिट पोलवर टीका करत या एक्झिट पोलचे नाव ‘मोदी मीडिया पोल’, हा ‘फॅंटसी पोल’ असे आहे, असे वक्तव्य केले. जेव्हा त्यांना इंडि आघाडीच्या किती जागा येतील देशात तेव्हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐकले का? असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना करत २९५ जागा इंडि आघाडीच्या येतील, असा दावा गांधी यांनी केला. (Lok Sabha Exit Poll)

‘४०० पार’चा भाजपाचा नारा हवेत विरेल

राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही एक उदाहरण देत एक्झिट पोलवर टीका केली. “देशातील १० पैकी ८ जण मोदी सरकारच्या विरोधात असताना असा एक्झिट पोल कसा येऊ शकतो? त्यामुळे एक्झिट पोल चुकीचे ठरतील आणि ‘४०० पार’चा भाजपाचा नारा हवेत विरेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले. (Lok Sabha Exit Poll)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.